RSS Vijayadashami Program
नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी श्री विजयादशमी उत्सव कार्यक्रम स्थळाचे भूमिपूजन आज (दि.६) अनंत चतुर्दशीच्या शुभमुहुर्तावर करण्यात आले. शताब्दी वर्षाच्या निमित्ताने यावर्षीच्या विजयादशमी सोहळ्याला विशेष महत्व असून माजी राष्ट्रपती रामनाथ कोविद प्रमुख अतिथी असणार आहेत.
नागपूर महानगर संघचालक राजेश लोया यांच्या हस्ते रेशीमबागेत हे भूमिपूजन झाले. यावेळी शिवाजीनगर शाखेचे 98 वर्षांचे ज्येष्ठ स्वयंसेवक दत्तोपंत भागवतवार, विक्रम शाखेचे 95 वर्षांचे ज्येष्ठ स्वयंसेवक श्रीराम गाढवे, विदर्भ प्रांत सहसंघचालक श्रीधरराव गाडगे , विदर्भ प्रांत प्रचारक गणेश जी शेटे, ज्येष्ठ प्रचारक राजाभाऊ देशपांडे तथा प्रांत - महानगरातील अधिकारी, मा. भाग संघचालक, नगर संघचालक , स्वयंसेवक उपस्थित होते.