Nagpur Revenue Inspector Bribe Case  Pudhari
नागपूर

Nagpur Bribe | 25 हजारांची लाच घेताना रेव्हेन्यू इन्स्पेक्टर 'लाचलुचपत'च्या जाळ्यात

एका प्रकरणात फेरफार करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्याने तब्बल 75 हजार रुपयांची मागणी

पुढारी वृत्तसेवा

Nagpur Revenue Inspector Bribe Case

नागपूर: जिल्ह्यात सावनेर तहसील कार्यालयातील रेव्हेन्यू इन्स्पेक्टर 25 हजारांची लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात अडकला. प्रवीण मेश्राम असे अधिकाऱ्याचे नाव आहे. या कारवाईमुळे महसूल विभागात खळबळ उडाली आहे.

पाटणसावंगी येथील कार्यालयात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पथकाने 25 हजार रुपयांची लाच स्वीकारताना ही कारवाई केल्याची माहिती समोर आली आहे. प्राथमिक माहितीनुसार, संबंधित प्रकरणातील फेरफार करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्याने तब्बल 75 हजार रुपयांची मागणी केली होती. त्यापैकी 50 हजार रुपये यापूर्वी स्वीकारण्यात आल्याचे सांगितले जात आहे. उर्वरित 25 हजार रुपये स्वीकारताना एसीबीच्या पथकाने सापळा रचून ही कारवाई केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT