नागपूर परिक्षेत्रीय मेळाव्यात हवालदार जगदीश डाफ यांचा सत्कार करण्यात आला  Instagram
नागपूर

नागपूर परिक्षेत्रीय मेळावा | हवालदार जगदीश डाफ यांचा उत्कृष्ट कामगिरीबद्दल सत्कार

Nagpur News | नागपूर परिक्षेत्रीय मेळाव्यात तीन प्रकारात ३ पदके

पुढारी वृत्तसेवा

वर्धा - जिल्हा पोलिस नागपूर ग्रामीणच्या वतीने १९ वा नागपूर परिक्षेत्रीय पोलिस कर्तव्य मेळावा नागपूर येथे पार पडला. या स्पर्धेत पोलिस हवालदार जगदीश डाफ यांनी वर्धा जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करताना तीन वेगवेगळ्या विषयांच्या स्पर्धांत भाग घेत तिन्ही स्पर्धा प्रकारात उत्कृष्ट कामगिरी करीत पदक प्राप्त केले. (Nagpur News)

एकाच स्पर्धेत तीन वेगवेगळ्या प्रकारांत तीन पदके जिंकून पोलिस हवालदार जगदीश डाफ यांनी विक्रम प्रस्थापित केला आहे. त्यांनी क्राइम्स सिन ऑब्झर्वेशन, क्राईम सीन फोटोग्राफी आणि पोट्रेट ऑब्झर्वेशन या तीन प्रकारात प्रत्येकी एक पदक प्राप्त केले. या स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करून वैयक्तिक तीन पदके मिळवीत त्यांनी जिल्ह्याचा नावलौकिक वाढविला आहे. या यशाबद्दल जगदीश डाफ यांचा नागपूर येथील स्पेशल आयजी यांनी सत्कार केला. तसेच जिल्ह्याला नावलौकिक वाढविल्याबद्दल पोलिस अधीक्षक अनुराग जैन यांनीही त्यांचा सत्कार केला. जगदीश डाफ यांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT