Heavy rain in Nagpur from July 18 to 21, alert issued
नागपुरात १८ ते २१ जुलैपर्यंत मुसळधार पाऊस, अलर्ट जारी File Photo
नागपूर

Nagpur Rain Update : नागपुरात १८ ते २१ जुलैपर्यंत मुसळधार पाऊस, अलर्ट जारी

पुढारी वृत्तसेवा

नागपूर : पुढारी वृत्‍तसेवा

हवामान खात्याने नागपूर जिल्ह्यामध्ये 18 ते 21 जुलै या कालावधीत मुसळधार पाऊस, वादळीवारा, विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तविली आहे. दि. 18 व 21 जुलै रोजी येलो अलर्ट तर 19 व 20 जुलै रोजी ऑरेज अलर्ट देण्यात आला आहे. या कालावधीत काही ठिकाणी खूप मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवलेली आहे. सुरक्षिततेच्यादृष्टीने जिल्हा प्रशासनाच्यावतीने वेळोवेळी दिल्या जाणाऱ्या सूचनांचे जिल्ह्यातील समस्त नागरिक व शेतकऱ्यांनी पालन करावे व स्वसंरक्षणासाठी सतर्क राहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे. (Nagpur Rain Update)

वीज गर्जना होत असताना शक्यतो घरातच राहणे आवश्यक आहे. अशा कालावधीमध्ये मोबाईल फोनसोबत बाळगू नये. याचबरोबर घरातील इलेक्ट्रिकल उपकरणे बंद ठेवावीत. पाऊस व वीज गर्जना होत असताना चुकूनही झाडाच्या खाली उभे राहू नये व शेतात काम करत असताना सुरक्षित ठिकाणी आसरा घ्यावा, असे जिल्हा प्रशासनाने म्हटले आहे. याशिवाय जल पर्यटन स्थळी उत्साहात, जीव धोक्यात घालणारी कुठलीही कृती करू नये. (Nagpur Rain Update)

शक्यतो पाण्यामध्ये उतरण्याचे धाडस करू नये. आपण कितीही चांगले जलतरणपट्टु असलो तरी देखील अशा ठिकाणी पोहण्याचे टाळावे. नदी, नाले दुथडी भरुन वाहत असतांना पाणी पुलावरून किंवा रस्त्यावरून वाहत असतांना चुकूनही तो पूल किंवा रस्ता चालत किंवा गाडी मधुन ओलांडण्याचा प्रयत्न करू नये असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, नागपूर जिल्हा नियंत्रण कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालयाने केले आहे.(Nagpur Rain Update)

SCROLL FOR NEXT