नागपूर : जबलपूर ते नागपुर रोडवर नाकाबंदी सुरू असताना बोर्डा गावाजवळ एका आयशर ट्रक क्र MH३४BG९१४३ मध्ये अवैधरित्या नेली जाणारी 32 गोवंशीय जनावरे जप्त करण्यात आली आहेत.
३ आरोपींविरुद्ध पोलिस स्टेशन कन्हान येथे विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून ६ लाख ४० किमतीचे ३२ गोरे, 17 लाखांचा आयसर ट्रक असा एकूण २३ लाख ४० हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार , अप्पर पोलीस अधीक्षक रमेश धुमाळ व पोलीस उप-अधीक्षक विजय माहुलकर व पोलीस निरीक्षक वैभव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
कन्हान येथील वाहतुक अंमलदार हेड कॉन्स्टेबल विजय तायडे, रवींद्र बर्वे,अतुल धुमणे, मनीष चौहान, सुधीर यादव यांनी पो. स्टे. कन्हान हद्दीत हे गोवंश घेऊन जाणारे वाहन पकडले.