Cannabis Seized Pudhari
नागपूर

Nagpur Ganja Seized | नागपुरात मोठी कारवाई : ओडिशातून आलेला सव्वा सहा कोटींचा गांजा पकडला; 4 जणांना अटक

अंमली पदार्थ तस्करीविरुद्धच्या मोहिमेत महसूल गुप्तचर संचालनालयाच्या (डीआरआय) नागपूर प्रादेशिक युनिटची कारवाई

पुढारी वृत्तसेवा

Cannabis Seized Nagpur

नागपूर : अंमली पदार्थ तस्करीविरुद्धच्या मोहिमेत महसूल गुप्तचर संचालनालयाच्या (डीआरआय) नागपूर प्रादेशिक युनिटने होळीपूर्वीच सुमारे सव्वा सहा कोटींचा गांजा पकडला आहे. ओडिशा-मध्य भारत कॉरिडॉरवर केलेल्या दोन मोठ्या कारवायांमध्ये डीआरआयने ६.२५ कोटी रुपये किमतीचा तब्बल १,२५१ किलो गांजा जप्त केला आहे. या प्रकरणी मुख्य सूत्रधारासह एकूण चार जणांना अटक करण्यात आली आहे.

ओडिशा-आंध्र प्रदेश सीमेवरून मध्य प्रदेशकडे जाणाऱ्या एका बोलेरो पिकअप गाडीला डीआरआय अधिकाऱ्यांनी अडवले. या गाडीची झडती घेतली असता आल्याच्या पोत्यांखाली लपवलेली ७२९ किलो वजनाची ५३ पाकिटे सापडली. या गांजाची किंमत ३.६४ कोटी रुपये इतकी आहे. या कारवाईत दोन जणांना अटक करण्यात आली असून, त्यातील एक जण अनेक दिवसांपासून फरार मुख्य सूत्रधार आहे.

यापूर्वी महामार्ग-४७ वरील भागीमहारी टोल प्लाझा येथे एका ट्रकमध्ये कूलर, टेबल फॅन आणि ब्लँकेट्सच्या आड ५२२ किलो गांजा तस्करी केली जात होती. ओडिशा सीमेवरून देशाच्या विविध भागांत होणाऱ्या अंमली पदार्थांच्या पुरवठ्यावर या कारवाईमुळे मोठा परिणाम होण्याची चिन्हे आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT