Nagpur News - पोलीस अधीक्षकांच्या बंगल्यावर तैनात कॉन्स्टेबलने उचलले टोकाचे पाऊल file photo
नागपूर

Nagpur News | शेअर बाजारात नुकसान! पोलीस कर्मचाऱ्याने उचलले टोकाचे पाऊल

नागपूर पोलीस अधीक्षक कार्यालयातील घटना

पुढारी वृत्तसेवा

नागपूर : शेअर बाजारातील गुंतवणुकीत मोठे नुकसान झाल्याच्या नैराश्यातून नागपुरात पोलीस कर्मचाऱ्याने स्वतःवर गोळी झाडून जीवन संपवण्याचा प्रयत्न केला. विशाल तुमसरे, असे त्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. तुमसरे यांची रुग्णालयात मृत्यूशी झुंज सुरू आहे.

नागपूरचे पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांच्या बंगल्यावर गार्ड ड्युटीमध्ये तैनात असलेले पोलीस कर्मचारी विशाल तुमसरे यांनी आज सकाळी स्वतःच्याच बंदुकीतून स्वतःवर गोळी झाडून जीवन संपवण्याचा प्रयत्न केला. स्वतः पोलीस अधीक्षकांनी विशाल तुमसरेला एम्स रुग्णालयात नेऊन दाखल केले. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची स्थिती गंभीर आहे. धक्कादायक बाब म्हणजे शेअर बाजारातील गुंतवणुकीत मोठे नुकसान झाल्यामुळे तुमसरे यांनी स्वतःवर गोळी झाडून जीवन संपवण्याचा प्रयत्न केल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT