Nagpur Police (File Photo)
नागपूर

Nagpur Police | काैंटुबिक वादातून पोलिस शिपायाचा आत्महत्येचा प्रयत्न!

वाठोडा पोलिस ठाण्यात कार्यरत पोलिस, घरी कुणी नसताना विष घेतले, उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल

पुढारी वृत्तसेवा

नागपूर - वाठोडा पोलिस ठाण्यातील पोलिस शिपायाने विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. ही घटना रविवारी (ता.२२) दुपारी चार वाजताच्या सुमारास उघडकीस आली. या प्रकाराने पोलिस ठाण्यात एकच खळबळ उडाली.

जयंता झाडे (रा. उमरेड) असे पोलिस शिपायाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, त्याचे पत्नीशी भांडण होत असल्याने रविवारी घरात कुणीही नसताना त्याने विष प्राशन केले. ही बाब निदर्शनास येताच, त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती स्थिर असून याप्रकरणी पोलिसांनी घटनेची नोंद केली घेतली असून पोलिस तपास करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT