सार्वजनिक ठिकाणी अवैध व्यवसाय करणाऱ्या ६ महिलांवर कारवाई 
नागपूर

Nagpur Crime : सार्वजनिक ठिकाणी अवैध व्यवसाय करणाऱ्या ६ महिलांवर कारवाई

वाहतुकीला अडथळा आणणाऱ्या दोन ऑटोचालकांवरही कारवाईचा बडगा

पुढारी वृत्तसेवा

नागपूर : शहरातील गंगा-जमुना परिसरात सार्वजनिक ठिकाणी अवैध व्यवसाय करणाऱ्या व अश्लील हावभाव करून ग्राहकांना आकर्षित करणाऱ्या सहा महिलांवर गुरूवारी (दि.१९) पोलिसांनी कारवाई केली. त्यांच्यावर लकडगंज पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले. याबरोबरच रस्त्यावर बेशिस्तपणे ऑटो उभे करून वाहतूक कोंडी करणाऱ्या दोन ऑटोचालकांवरही गुन्हे दाखल करण्यात आले.

गंगा-जमुना सिमेंट रोड आणि परिसरातील विविध गल्ल्यांमध्ये गुरुवारी (दि.१९) दुपारी १ च्या सुमारास पोलिसांनी अचानक ही मोहीम राबवली. सार्वजनिक ठिकाणी अश्लील हावभाव करून ग्राहकांना आकर्षित केल्याच्या आरोपावरून सहा महिलांविरोधात कारवाई करण्यात आली. याप्रकरणी लकडगंज पोलीस ठाण्यात अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायद्याच्या अंतर्गत तीन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले. याच मोहिमेदरम्यान, गंगा-जमुना परिसरातील मुख्य रस्त्यांवर बेकायदेशीरपणे ऑटो उभे करून वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या दोन ऑटोचालकांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्याविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुकुंद कवाडे यांच्या नेतृत्वाखाली महिला पोलीस कर्मचारी आणि लकडगंज पोलीस ठाण्याच्या विशेष पथकाने ही मोहीम यशस्वीपणे पार पाडली. गंगा-जमुना परिसरातील सार्वजनिक ठिकाणी होणाऱ्या गैरप्रकारांना कायमस्वरूपी आळा घालणे, परिसरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवणे आणि कायदा-सुव्यवस्था अबाधित राखणे, हाच या धडक कारवाईमागील मुख्य उद्देश असल्याचे पोलीस प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT