नागपूर - राष्ट्रीय ओबीसी महासंघातर्फे आज राज्यभर आंदोलन झाले. नागपूरमध्ये संविधान चौकात भव्य धरणे आंदोलनाला ओबीसी बांधव तसेच जात संघटनांचे प्रतिनिधी सहभागी झाले. ओबीसी समाजाने सरकारला साथ दिली असली तरी आपल्या मागण्याकडे दुर्लक्ष झाल्यास आंदोलन अटळ असल्याचा विनंतीवजा इशारा यावेळी देण्यात आला.
विशेष करुन महाज्योतीमार्फत पी एच डी धारकांना जी शिष्यवृत्ती प्रदान करायची होती ती शिष्यवृत्ती अजूनपर्यंत आली नाही. या मागणीसाठी राज्यातील नंदुरबार, सातारा, कोल्हापूर, नाशिक आदी अनेक जिल्ह्यातुन पीएचएचडी धारक विद्यार्थी या धरणे आंदोलनात सहभागी झाले.
राष्ट्रीय ओबीसी महासंघ सातत्याने ओबीसी जातिनिहाय सर्वेक्षण करण्याबाबत पाठपुरावा करीत आहे , परंतु अजूनपर्यंत हे सर्व्हेक्षण सुरू करण्यात आलेले नाही. ही मागणी या आंदोलनात प्रकर्षाने अनेकांनी मांडली. यावेळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ बबनराव तायवाडे, शरद वानखेडे, परमेश्वर राऊत, शकील पटेल, गुणेश्वर आरिकर, यांनी मार्गदर्शन केले.
डॉ. बबनराव तायवाडे यांनी सांगितले की ओबीसी विद्यार्थ्यांनी अत्यंत जागृत राहणे अत्यंत आवश्यक आहे.ओबीसीची कोणतीही मागणी जोपर्यंत पूर्ण होत नाही तो पर्यंत ती मागणी सरकारकडे करत रहावी लागते, सरकारला ओबीसी समाजाने निवडून दिले असेल पण ओबीसींच्या समस्याकडे कडे लक्ष दिले नाही तर ओबीसी महासंघाला राज्यव्यापी आंदोलन करावेच लागेल हा सरकारला इशारावजा विनंती करण्यात आली. ओबीसी समस्याचे निवेदन घेऊन शिष्टमंडळ जिल्हाधिकारी यांचे कडे गेले. यात सर्वश्री शरद वानखेडे, सुभाष घाटे, शकील पटेल, विजया धोटे, रुषभ राऊत ,अनिल चानपुरकर,सुरेश कोंडे हजर होते.
या आंदोलनाला पदवीधर आमदार ऍड अभिजित वंजारी यांनी भेट दिली. नरेश बर्डे यांनी सुध्दा आंदोलनाला भेट दिली, यात गुणेश्वर आरिकर, रुषभ राऊत, चंद्रकांत हिंगे, घनश्याम मांगे, मंगेश कामोने, राकेश ईखार, अनिल चानपुरकर यांच्यासह महिला ओबीसी महासंघ, ओबीसी विद्यार्थ्यी महासंघ, ओबीसी युवा महासंघ इत्यादी मोठ्या संख्येने उपस्थित होते.