Nagpur News | महाप्रसाद करताय, पण गॅस सिलिंडर कुठले वापरता? घरगुती सिलिंडरचा गैरवापर झाल्यास कडक कारवाई 
नागपूर

Nagpur News | महाप्रसाद करताय, पण गॅस सिलिंडर कुठले वापरता? घरगुती सिलिंडरचा गैरवापर झाल्यास कडक कारवाई

पुरवठा विभागात एलपीजी (LPG) गॅस एजन्सीधारकांची आणि तेल कंपन्यांच्या अधिकाऱ्यांची विशेष आढावा बैठक

पुढारी वृत्तसेवा

नागपूर: यापुढे घरगुती सिलिंडरचा काळाबाजार व गैरवापर झाल्यास कडक कारवाई; गैरहजर तेल कंपनी चे अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजवणार! आहे. गणेशोत्सव कालावधीत विविध गणेश मंडळे, सार्वजनिक संस्था व आयोजकांकडून आयोजित केले जाणारे महाप्रसाद, सामुदायिक भोजन व इतर सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये केवळ व्यावसायिक गॅस सिलिंडरचाच वापर केला गेला पाहिजे. कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी किंवा मंडळांमध्ये घरगुती वापराच्या सिलिंडरचा व्यावसायिक वापर आढळल्यास संबंधित एजन्सी व वापरकर्त्यावर कडक कारवाई केली जाईल.

गणेशोत्सव व आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर, तसेच नागरिकांच्या सुरक्षेच्या आणि नियमित पुरवठ्याच्या दृष्टिकोनातून अन्नधान्य पुरवठा अधिकारी कार्यालय, नागपूर शहर येथे शहर अन्नधान्य पुरवठा अधिकारी श्रीमती शालिनी गेडाम यांच्या अध्यक्षतेखाली एलपीजी (LPG) गॅस एजन्सीधारकांची आणि तेल कंपन्यांच्या अधिकाऱ्यांची एक विशेष आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती.

सदर बैठकीला भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (BPCL) चे सेल्स ऑफिसर श्री. नितीन खोत उपस्थित होते. मात्र, बैठकीचे महत्त्व असूनही इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड (IOCL) आणि हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (HPCL) चे सेल्स अधिकारी बैठकीस अनुपस्थित राहिल्याने, सुरक्षेसारख्या गंभीर विषयावर गैरहजर राहणाऱ्या या अधिकाऱ्यांना कारण दाखवा (शोकाज) नोटीस बजावण्यात येणार असल्याचे बैठकीत स्पष्ट करण्यात आले.

प्रत्येक ग्राहकाला घरगुती गॅस सिलिंडर वेळेवर आणि योग्य प्रमाणात उपलब्ध करून देण्यात यावा. कोणत्याही परिस्थितीत गॅस सिलिंडरचा काळाबाजार, अनधिकृत साठवणूक किंवा बेकायदेशीर विक्री होता कामा नये.

कारवाईचा इशारा:

अन्नधान्य पुरवठा अधिकारी श्रीमती शालिनी गेडाम यांनी बैठकीत सर्व एजन्सीधारकांना १ आठवड्याची मुदत दिली. आहे. या एका आठवड्याच्या कालावधीत सर्व त्रुटी व सुरक्षेची साधने दुरुस्त करून नियमांचे काटेकोर पालन सुनिश्चित करावे. यानंतरही नियमांचे उल्लंघन किंवा तक्रारी आढळल्यास पुरवठा विभागामार्फत कडक कायदेशीर व दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT