नागपूर - नागपूरच्या मेयो रुग्णालयातील फॉरेन्सिक मेडिसीन आणि विष विज्ञान विभागाच्या प्रमुखाविरोधात निवासी डॉक्टरांनी सामूहिक तक्रार दिली आहे. लैंगिक छळ, शैक्षणिक गैरवर्तन, आणि सततच्या मानसिक छळाचे गंभीर आरोप करीत ही तक्रार करण्यात आली आहे.
दरम्यान,या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता महाराष्ट्र असोसिएशन ऑफ रेसिडेंट डॉक्टर्स (मार्ड) ने थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही तक्रारीचे निवेदन सादर केले आहे. या तक्रारीची दखल घेत मेयो रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ.रवी चव्हाण यांनी विशाखा समिती गठन केली आहे.
चौकशी पूर्ण होईपर्यंत संबंधित त्वरित निलंबित करण्यात यावे. सोबतच व्हाट्सअप संदेश, कॉल रेकॉर्डिंग, ई-मेल, आणि 9 डिसेंबर 2025 रोजी सायंकाळपर्यंतचे सीसीटीव्ही फुटेसह सर्व डिजिटल पुरावे प्रशासनाने तात्काळ जतन करावे अशी मागणी निवासी डॉक्टरांनी केली आहे.