Nagpur News | फ्लाइट लेफ्टनंट पूर्वेश दुरगकर यांच्यावर अंत्यसंस्कार! 
नागपूर

Nagpur News | फ्लाइट लेफ्टनंट पूर्वेश दुरगकर यांच्यावर अंत्यसंस्कार!

आसामच्या कार्बी आंगलोंग परिसरात सुखोई विमान कोसळून झालेल्या अपघातात झाले होते शहीद

पुढारी वृत्तसेवा

नागपूर - नागपूरचे सुपूत्र फ्लाइट लेफ्टनंट पूर्वेश रवींद्र दुरगकर यांचा आसामच्या कार्बी आंगलोंग परिसरात भारतीय वायुसेनेचे सुखोई विमान कोसळून झालेल्या भीषण अपघातात मृत्यू झाला. शनिवारी सायंकाळी मानेवाडा घाट येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचे शौर्य, समर्पण आणि देशभक्तीचा अभिमान नागपूरसह संपूर्ण देशाला सदैव स्मरणात राहील या शब्दात पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी श्रद्धांजली अर्पण केली.

फ्लाइट लेफ्टनंट पूर्वेश दुरगकर यांचे पार्थिव शुक्रवारी नवी दिल्ली येथे आणण्यात आले. तिथे मानवंदना दिल्यानंतर पार्थिव येथील सोनेगाव एअरफोर्स स्टेशन आणण्यात आले. तेथून ते न्यू सुभेदार लेआउट येथील पूर्वेश दुरगकर यांच्या घरी कुटुंबीयांना सुपूर्द करण्यात आले. मानेवाडा घाट येथे शासकीय इतमामात पार पडलेल्या अंत्यसंस्कारावेळी जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर तसेच भारतीय हवाई दलातील वरिष्ठ अधिकारी, जवान आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती. लष्करी परंपरेनुसार पूर्ण सन्मानात अंत्यसंस्काराची प्रक्रिया पार पडली. यावेळी जवानांनी हवेत राउंड फायर करून मानवंदना दिली. अंत्यसंस्कारावेळी नातेवाईक, मित्रपरिवार, स्थानिक नागरिक तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT