Nagpur News | मनपाच्या आरोग्य विभागाकडून शहरातील ६६२ नोंदणीकृत रुग्णालयांची तपासणी मोहीम!  
नागपूर

Nagpur News | मनपाच्या आरोग्य विभागाकडून शहरातील ६६२ नोंदणीकृत रुग्णालयांची तपासणी मोहीम!

रुग्णांना दर्जेदार व सुरक्षित आरोग्यसेवा मिळावी यासाठी मनपाचा पुढाकार ; आतापर्यंत २११ रुग्णालयांची तपासणी

पुढारी वृत्तसेवा

नागपूर : नागपूर शहरातील रुग्णालयांमध्ये नागरिकांना दर्जेदार, सुरक्षित आणि नियमबद्ध आरोग्यसेवा उपलब्ध व्हावी, यासाठी नागपूर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागामार्फत शहरातील सर्व ६६२ नोंदणीकृत रुग्णालयांची तपासणी मोहीम हाती घेण्यात आली आहे.

या तपासणी मोहिमेदरम्यान रुग्णालयातील उपलब्ध खाटांची संख्या, अग्निसुरक्षा व्यवस्था, जैववैद्यकीय कचरा व्यवस्थापन, तसेच रुग्ण हक्कांचा (Patients’ Rights) चार्ट दर्शनी भागात लावण्यात आला आहे किंवा नाही,उपचारावरील खर्चा संबंदी दर फलक (Rate chart)याची तपासणी करण्यात येत आहे. तसेच, संबंधित रुग्णालयांनी महाराष्ट्र नर्सिंग होम नोंदणी अधिनियम व संबंधित नियमांचे पालन करणे आवश्यक असल्याचे आरोग्य विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.तपासणीदरम्यान आढळून येणाऱ्या त्रुटींची पूर्तता करण्यासाठी संबंधित रुग्णालयांना आवश्यक त्या सूचनेसह नोटीस देण्यात येत आहेत.

मनपा आरोग्य विभागामार्फत मनपाच्या शहरातील १८ नियमित वैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत रुग्णालयांची तपासणी राबविण्यात येत असलेल्या तपासणी मोहिमेंतर्गत आतापर्यंत २११ रुग्णालयांची तपासणी पूर्ण करण्यात आली असून, नियमांचे पालन न करणाऱ्या अथवा त्रुटी आढळून आलेल्या  रुग्णालयांना नोटीस बजावण्यात आली आहे. तसेच उर्वरित नोंदणीकृत रुग्णालयांचीही दैनंदिन तपासणी करण्यात येत आहे.

ही मोहीम नागपूर महानगरपालिकेच्या महापौर श्रीमती निता ठाकरे यांच्या आदेशानुसार राबविण्यात येत असून, उपमहापौर श्रीमती लीला हाथीबेड, मा. स्थायी समिती सभापती श्रीमती शिवानी दाणी-वखरे, सत्तापक्ष नेते श्री नरेंद्र (बाल्या) बोरकर, वैद्यकीय सेवा व आरोग्य विशेष समितीच्या सभापती श्रीमती मनिषा अतकरे, आयुक्त डॉ. विपीन इटनकर आणि अतिरिक्त आयुक्त  अंकित यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच  वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर, अतिरिक्त वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. नरेंद्र बहिरवार आणि साथरोग अधिकारी डॉ. गोवर्धन नवखरे यांच्या देखरेखीखाली राबविण्यात येत आहे.

रुग्णांच्या सुरक्षिततेला आणि गुणवत्तापूर्ण आरोग्यसेवेला सर्वोच्च प्राधान्य देत ही तपासणी मोहीम राबविण्यात येत आहे.तपासणीदरम्यान नियमांचे उल्लंघन किंवा गंभीर त्रुटी आढळून आल्यास संबंधित रुग्णालयांवर नियमानुसार आवश्यक ती कार्यवाही करण्यात येईल, अशी माहिती मनपा आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.

आज वैद्यकीय सेवा व आरोग्य विशेष समितीच्या सभापती श्रीमती मनिषा अतकरे यांच्या मार्गदर्शनाखाली दळवी स्मारक रुग्णालय व अनुसंधान केंद्र (धर्मादाय रुग्णालय), श्रेयस हॉस्पिटल आणि तारांगण हॉस्पिटल येथे भेट देऊन रुग्णांसाठी उपलब्ध सोयी-सुविधा तसेच आरोग्यसेवेशी संबंधित व्यवस्थेची पाहणी करण्यात आली. यावेळी मा. वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर, अन्न निरीक्षक श्री. मुकुंद खुजे व धर्मदाय रुग्णालयाचे डॉ. सोनल भट्टी, डॉ. आभा कुंभारे तसेच मनपाचे संबंधित अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT