AI image  
नागपूर

Nagpur News | चुकून बेंचखाली झोपला आणि रात्रभर शाळेतच राहिला : चार वर्षीय हिमांशूला सुरक्षित पाहून आई-वडिलांचा जीव भांड्यात पडला!

सावनेर येथील शाळेतील प्रकार, अंधाऱ्या खोलीत अन्न पाण्याविना रात्र काढली, धाडसाचे होतेय कौतुक

Namdev Gharal

नागपूर - हिमांशू बागडे हा चार वर्षीय मुलगा जीप उच्च प्राथमिक शाळा चिंचोली रन खापरखेडा तालुका सावनेर येथील वर्गखोलीत रात्रभर अन्न,पाण्याविना सुरक्षित राहिल्याने त्याच्या धाडसाचे कौतुक आणि सर्वत्र कुतुहल व्यक्त होत आहे.

शाळा सुटली तरी मुलगा घरी न आल्याने आई,वडिलांची चिंता वाढली. गावात शोधाशोध झाली. अखेर दुसऱ्या दिवशी सकाळी 11 वाजता ही वर्गखोली उघडली गेली त्यावेळी हिमांशू हा बेंचखाली झोपलेल्या अवस्थेत होता.

रात्रभर एका अंधाऱ्या खोलीत अन्न, पाण्याशिवाय तो धाडसाने सुरक्षित राहिला हे बघून त्याच्या आई वडिलाना देखील आनंदाश्रु अनावर झाले. कारण त्यापूर्वी दिवसरात्र त्यांनी बरीच शोधाशोध केली. खापरखेडा पोलिसात तक्रार देखील दाखल झाली. पोलिसांनी बरीच शोधाशोध केली. शाळेच्या आजुबाजूला घरे असताना त्यांना या मुलाचा रडण्याचा आवाज देखील आला नाही हे विशेष. आम्ही शाळेत देखील चौकशी केली मात्र कुठेही त्याचा शोध लागला नाही. रात्रभर वाट बघितल्यावर आमचा मुलगा आम्हाला मिळाला याचा अत्यानंद आल्याचे आईने स्पष्ट केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT