धर्मभास्कर सद्गुरुदास महाराज पंचत्वात विलीन झाले यावेळी अंत्यदर्शनासाठी हजारो भाविकांची गर्दी केली होती  
नागपूर

Nagpur News |धर्मभास्कर सद्गुरुदास महाराज पंचत्वात विलीन, अंत्यदर्शनासाठी हजारो भाविकांची गर्दी 

निधनाने आध्यात्मिक क्षेत्रात शोककळा, विविध क्षेत्रातील मान्यवरांनी व्यक्त केल्या शोकभावना

पुढारी वृत्तसेवा

नागपूर -  शिवकथाकार, आध्यात्मिक गुरु  धर्मभास्कर सद्गुरुदास महाराज यांच्या पार्थिवावर गुरुवारी सहकार नगर घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. बुधवारी  सायंकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने आध्यात्मिक क्षेत्रात शोककळा पसरली. काल व आजही भाविकांनी अंत्यदर्शनार्थ श्री गुरुमंदिरात गर्दी केली.

राष्ट्रसेविका समितीच्या चित्राताई जोशी,  रा. स्व. संघाचे प्रचारक रवींद्र भुसारी, श्याम पत्तरकिने, डॉ.विलास डांगरे, ज्येष्ठ पत्रकार लक्ष्मणराव जोशी, माजी कुलगुरु डॉ. पंकज चांदे, कल्याणी देशमुख, छत्रपती सेवा प्रतिष्ठानचे अनंत महाजन, हनुमंत महाजन, रा. स्व. संघाचे विदर्भ प्रांत प्रचारक ऋषीकेश तावडे, राजे मुधोजी भोसले, ज्येष्ठ निरुपणकार डॉ. स्वानंद पुंड, श्रीराम महाराज जोेशी आदी मान्यवरांनी अंत्यदर्शन घेतले. बासर, विदर्भातील भांबेरी, अकोला, अमरावती, यवतमाळ, गडचिरोली आदी केंद्रांचे उपासकानी  मंदिरात त्यांच्या पार्थिवाचे दर्शन घेतले.  हजारो भाविकांनी सामूहिक प्रार्थना व उपासना केली. 

महाराजांचे पार्थिव मंदिरातून तळमजल्यावर मंत्राग्नीच्या विधीसाठी आणण्यात आले, त्यावेळी उपस्थित हजारो भाविकांनी महाराजांना डोळे भरुन पाहण्यासाठी गर्दी केली. दुपारी संपूर्ण सरंजामासह निघालेल्या अंत्ययात्रेत प्रत्येक माणूस पायदळ सहभागी झाला. मंदिरापुढील ज्या रस्त्यावरुन अंत्ययात्रा मार्गक्रमण करणार होती, त्या रस्त्यावर रांगोळ्या, फुलांची सजावट करण्यात आली होती.

पुढे फुलांनी सजविलेला छत्र, चामर आणि भगवा ध्वज असलेला रथ तयार होता. त्यावर महाराजांचे पार्थिव ठेवण्यात आले. त्यानंतर मंदिरापासून अंत्ययात्रा प्रारंभ झाली, त्यावेळी संपूर्ण मार्गावर महिला, पुरुष भाविक दुतर्फा उभे होते. पुत्र अजेय देशमुख यांनी अग्नी दिला. अंत्यसंस्कारानंतर झालेल्या शोकसभेत रा. स्व संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या संदेशाचे वाचन करण्यात आले. 

डॉ. स्वानंद पुंड, दुर्ग प्रतिठानचे अतुल गुरु, राज्याभिषेक सोहळा समितीचे दत्ता शिर्के, भाजपा तर्फे संजय बंगाले, श्री गुरुमंदिर परिवारातर्फे अरुण कडबे, गीता परिवारतर्फे श्रीनिवास वर्णेकर, रा. स्व. संघातर्फे श्रीकांत चितळे, रवींद्र बोकारे, नागपूरचे माहिती आयुक्त गजानन निमदेव,  श्रीपाद अपराजित,  प्रमोद काळबांडे, जनआक्रोशचे रवींद्र कासखेडीकर, वि. सा. संघाचे अध्यक्ष प्रदीप दाते, शिवप्रतिष्ठानच संभाजी भिडे यांनी श्रद्धांजली व्यक्त केली. 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT