Nagpur News | छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानाचा प्रारंभ, ‘महसूल’च्या सेवा तत्‍परतेने मिळणार 
नागपूर

Revenue services | छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानाचा प्रारंभ, ‘महसूल’च्या सेवा तत्‍परतेने मिळणार!

राज्यातील सर्व महसूल मंडळे तसेच नगरपालिका, नगरपंचायतीच्या क्षेत्रात पुढच्या तीन महिन्यात सहा दिवस अभियान राबविले जाणार

पुढारी वृत्तसेवा

नागपूर - राज्यातील प्रत्येक गरजू व्यक्तीला महसूल विभागाशी असलेल्या सेवा तत्परतेने मिळाव्यात, तहसील कार्यालयात गावपातळीवरील खेटे मारण्याची वेळ येवू नये या उद्देशाने 'छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान' आजपासून सुरु झाले. प्रत्येक तालुका पातळीवर आयोजित या शिबिरात नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.

महसूल विभागातील प्रत्येक अधिकारी कर्मचारी हे या अभियानाच्या माध्यमातून आपण जनतेचे सेवक आहोत याची प्रचिती सर्वसामान्य नागरिकांना देतील असा विश्वास राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला. राज्यातील सर्व महसूल मंडळे तसेच नगरपालिका, नगरपंचायतीच्या क्षेत्रात पुढच्या तीन महिन्यात सहा दिवस अभियान घेतले जाणार आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनानुसार सर्वसामान्य जनता, शेतकरी, शेतमजूर, विद्यार्थी आणि महिलांसाठी असलेल्या महसूल विभागातील महत्वाच्या १५ स्वरुपातील सेवा एकाच ठिकाणी एकाच दिवसात मार्गी लावण्याचा निर्णय घेतला. प्रभावीअंमलबजावणीसाठी राज्यपातळीवर आढावा बैठका घेऊन समित्या नेमल्या.

अभियानाचे वेळापत्रक

मार्च महिन्यातील शिबिरे: ७ मार्च (शनिवार) आणि १४ मार्च (शनिवार).

एप्रिल महिन्यातील शिबिरे: १० एप्रिल (शुक्रवार) आणि १७ एप्रिल (शुक्रवार).

मे महिन्यात नगरपरिषद/नगरपंचायत स्तरावर शिबिरे: ८ मे (शुक्रवार) आणि १५ मे (शुक्रवार)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT