इस्रोवरून परतले 44 विद्यार्थी, आता नासाची स्वारी!  नागपूरात बाल वैज्ञानिकाचा सन्मान सोहळा!  
नागपूर

Nagpur News | इस्रोवरून परतले 44 विद्यार्थी, आता नासाची स्वारी!  नागपूरात बाल वैज्ञानिकाचा सन्मान सोहळा! 

शिक्षण व गृह राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांचा पुढाकार

पुढारी वृत्तसेवा

नागपूर -ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची आवड निर्माण व्हावी आणि त्यांच्यातील सुप्त संशोधक गुणांना वाव मिळावा, या उद्देशाने जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात उत्कृष्ट ठरलेल्या वर्धा जिल्ह्यातील  44 गुणवंत विद्यार्थ्यांची निवड थेट बंगळुरू येथील भारतीय अवकाश संशोधन संस्थेच्या (ISRO) दौऱ्यासाठी करण्यात आली होती.

चार दिवसांचा हा हवाई प्रवास आणि संशोधनपर दौरा आटोपून हे  विद्यार्थी शिक्षकवृंदासह आज गुरुवारी नागपुरात दाखल झाले. इस्त्रोला भेट देऊन आलेल्या या इयत्ता सहावी ते अकरावीच्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री शिक्षण व गृह राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी यासाठी पुढाकार घेतला. जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून सुमारे 57 लाख रुपये यासाठी खर्च आला.

आता भविष्यात राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या किमान 50 विद्यार्थ्यांना मुख्यमंत्री विद्यार्थी विज्ञानवारी योजनेच्या माध्यमातून 'नासा अमेरिका' येथे पाठवण्याचा प्रयन्त राहणार असल्याचे राज्यमंत्री पंकज भोयर यांनी प्रसार माध्यमांशी बोलतांना सांगितले. यासंदर्भातील प्रस्ताव शिक्षण विभागामार्फत तयार करण्यात आला असून राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत या सुमारे तीन ते चार कोटी रुपयांच्या प्रस्तावाला मान्यता मिळाल्यानंतर या विद्यार्थ्यांचा दौरा निश्चित होणार आहे. महाशिवरात्री ते शिवजयंती असा हा संशोधनपर दौरा अतिशय उपयुक्त, खूप काही शिकविणारा ठरल्याची प्रतिक्रिया विद्यार्थ्यांनी आपले अनुभव कथन करताना व्यक्त केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT