नागपुरात पतंगबाजाच्या उत्साहाला मकरसंक्रांत निमित्त उधाण आले. Pudhari
नागपूर

Kite Flying Nagpur | नागपुरात निवडणुकीच्या धामधुमीत पतंगबाजाची धूम, महिलांच्या उत्साहालाही उधाण

निवडणुकीच्या रणधुमाळीत, गल्लीबोळातील गुप्त बैठकांमध्येच बुधवारी पतंगबाजाच्या उत्साहाला मकरसंक्रांत निमित्त उधाण आले

पुढारी वृत्तसेवा

Kite Festival 2026

नागपूर : नागपुरात महापालिका निवडणुकीसाठी गुरुवारी (दि.१५) मतदान होणार असल्याने राजकीय वातावरण तापले आहे. कुणाची पतंग उंच, विजयाच्या दिशेने उडणार कुणाचा पतंग ओकाट....! होणार, स्वप्नभंग होणार हे लगेच शुक्रवारी (दि. 16) निकालातून स्पष्ट होणार आहे.

निवडणुकीच्या रणधुमाळीत, गल्लीबोळातील गुप्त बैठकांमध्येच बुधवारी पतंगबाजाच्या उत्साहाला मकरसंक्रांत निमित्त उधाण आले. नागपुरात 14 ते 26 जानेवारी या कालावधीत पतंग उत्सव जोरात असतो. इतवारी परिसरातील बाटा जवळील तसेच शुक्रवारी परिसरातील ठोकविक्रेते या उत्सवात मांजा आणि पतंग यात कोट्यवधी रुपयांचा व्यवसाय करतात.

मंगळवारी रात्री उशिरापर्यंत या परिसरात तरुणाईची गर्दी होती. अखेरीस पोलिसांना दुकाने बंद करण्याचे आवाहन करावे लागले. दुसरीकडे महिलांच्या उत्साहाला देखील उधाण आले. आजपासून तीन, चार दिवस महिला मंडळींच्या तिळ गुळ, तीळवा, हळदी कुंकू कार्यक्रमांची लयलूट पहायला मिळणार आहे. अर्थातच या दोन्ही उत्सवांचा आपापल्यापरीने कुणाला शंका न येता अळीमिळी गुपचिळी पद्धतीने फायदा घेण्याचा प्रयत्न देखील काही राजकीय मंडळींनी न केला तरच नवल होईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT