नागपूर : पुढारी ऑनलाईन
38 प्रभागातील 151 नगरसेवकांसाठी होणाऱ्या मनपा निवडणुकीच्या मतमोजणीसाठी शहरातील दहाही झोन, मतमोजणी केंद्र सज्ज झाले आहेत. 3004 मतदान केंद्रावरून ईव्हीएम रात्री उशिरा पोहचल्या. 4009 कंट्रोल युनिट आणि दहा हजार 928 बॅलेट युनिटची मदत घेण्यात आली. 16 जानेवारी रोजी सकाळी दहा वाजता मतमोजणी सुरू होईल.
प्रत्येक निवडणूक निर्णयाधिकारी यांचेकडे 20 टेबल ईव्हीएमसाठी तर पोस्टल, बॅलेटसाठी चार टेबल असणार आहेत. प्रत्येक टेबलवर एक मतमोजणी पर्यवेक्षक, एक सहाय्यक नियुक्त करण्यात आलेले आहेत.
सर्व प्रभागांची एकावेळी मतमोजणी सुरू होणार असल्याने पहिला निकाल साधारणतः एक वाजेपर्यंत अपेक्षित आहे. एकाच वेळी पोस्टल आणि ईव्हीएमची मतमोजणी केली जाणार आहे. पोलीस बंदोबस्त आणि निवडणूक अधिकारी कर्मचारी असे 16 हजारांवर मनुष्यबळ यासाठी लागणार आहे.
प्रभाग 33 चे काँग्रेस उमेदवार मनोज गावंडे पहिल्या फेरीत 895 मताने आघाडीवर...
नागपूर महानगरपालिका-
एकुण जागा- 151
आघाडी…
भाजप- 25
शिवसेना- 02
राष्ट्रवादी- 00
ठाकरे- 00
काँग्रेस- 12
मनसे-00
शरद पवार गट- 00
इतर- 00
नागपूर - प्रभाग 28 भाजपचे पिंटू झलके पिछाडीवर 600 मतांनी, प्रभाग 36 भाजपच्या शिवानी दानी आघाडीवर.
भाजप 9, काँग्रेस 3 जागी आघाडीवर
मीडियाला नागपुरातील धंतोली झोनमध्ये प्रवेश पत्र असूनही मतमोजणी कक्षात प्रवेश नाकारला. 200 फुटावर असलेल्या डोममध्ये बसा असे सांगण्यात आले.
यावेळी नागपूर महानगरपालिका निवडणुकीत 51.38 टक्के मतदानाची नोंद झालीय.
2017 नागपूर महानगरपालिका निवडणुकमधे 53.72 टक्के मतदान झाले होते.
8 वर्षापूर्वी मतदारांची संख्या 20 लाख 93 हजार 392 मतदार होती.
तर यावेळी 24 लाख 83 हजार 112 मतदार आहे.
तरी देखील यावेळी मतदान सरासरी टक्क्यांपेक्षा कमी झाले आहे.
मतमोजणीसाठी शहरातील दहाही झोन,मतमोजणी केंद्र सज्ज झाले आहेत. 3004 मतदान केंद्रावरून ईव्हीएम रात्री उशिरा पोहचल्या.4009 कंट्रोल युनिट आणि दहा हजार 928 बॅलेट युनिटची मदत घेण्यात आली.आज शुक्रवारी 16 जानेवारी रोजी सकाळी दहा वाजता मतमोजणी सुरू होईल. प्रत्येक निवडणूक निर्णयाधिकारी यांचेकडे 20 टेबल ईव्हीएमसाठी तर पोस्टल,बॅलेटसाठी चार टेबल असणार आहेत.