अविनाश देऊस्कर 
नागपूर

Nagpur News | २०० हिमालयीन मोहिमा फत्ते करणारे साहसी गिर्यारोहक अविनाश देऊस्कर यांचे निधन!

हिमालयातील साहसी मोहिमा, गिर्यारोहण क्षेत्रात मोलाचे योगदान

पुढारी वृत्तसेवा

नागपूर - हिमालयातील साहसी मोहिमा, गिर्यारोहण आणि साहसाधारित शिक्षण क्षेत्रात मोलाचे योगदान देणारे नागपूरचे अविनाश देऊस्कर यांचे हृदयविकाराच्‍या तीव्र झटक्‍याने वयाच्‍या 62 वर्षी निधन झाले. त्यांच्या निधनाने साहस, गिर्यारोहण आणि व्यक्तिमत्त्व विकास क्षेत्रातील एक अनुभवी मार्गदर्शक हरपला आहे. ते रामनगर, नागपूर येथे राहत होते. त्‍याच्‍या पश्‍चात पत्‍नी गियारोहक विमला देऊस्‍कर, दोन मुले डॉ. कुणाला व तपन देऊस्‍कर तसेच, बराच आप्‍त परिवार आहे. त्‍यांच्‍या पार्थिवावर हरिद्वार येथे अंत्‍यसंस्‍कार करण्‍यात आले.

देऊस्कर यांनी १९८६ मध्ये काठमांडू ते लेह अशी २,३०० किलोमीटरची हिमालयीन पदयात्रा १४१ दिवसांत पूर्ण केली होती. या पहिल्या नागरी हिमालयीन पदयात्रेचे त्यांनी नेतृत्व केले होते. १९८३ पासून त्यांनी हिमालयात १३ हजार किलोमीटरपेक्षा अधिक गिरिभ्रमण केले. तसेच २०० हून अधिक हिमालयीन मोहिमा आणि १,२०० हून अधिक साहसी शिबिरांचे आयोजन केले.

साहस क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल त्यांना २०११ मध्ये ‘ऑरेंज सिटी अचिव्हमेंट अवॉर्ड’ने गौरविण्यात आले होते. साहसाधारित शिक्षणाच्या माध्यमातून नेतृत्वगुण, संघभावना आणि व्यक्तिमत्त्व विकास घडविण्यासाठी त्यांनी विशेष कार्य केले. आउटवर्ड बाउंड इंटरनॅशनलच्या भारतातील पहिल्या अधिकृत केंद्राची स्थापना करण्यात त्यांचा पुढाकार होता. मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील आदिवासी युवकांना पर्यायी रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठीही ते कार्यरत होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT