Horse Abuse Incident in Nagpur
नागपूर : हल्ली कलियुगात पैशाचा हव्यास, वासनांधतेपोटी कोण काय करेल, याचा काही नेम राहिलेला नाही. अशाच एका घटनेत कामावर असलेल्या ठिकाणी तरुणाने एका घोड्याशीच कुकर्म, अनैसर्गिक कृत्य करण्याचा प्रयत्न केला. ही घटना सेमिनरी हिल्स परिसरातील घोडेस्वारीचे प्रशिक्षण देणाऱ्या हॉर्स अकादमीत घडली. जाताना त्या भामट्याने चार लोखंडी एंगल देखील चोरून नेले. सीसीटीव्हीत हा सर्व प्रकार कैद झाल्याने फिर्यादीने गिट्टीखदान पोलिसांत तक्रार दाखल केली. आरोपींवर गुन्हाही दाखल केला आहे.
सुरज उर्फ छोट्या खोब्रागडे (रा. मानवतानगर) असे आरोपीचे नाव आहे. प्रमोद संपत लाडवे (वय 31, रा. हजारीपहाड) असे तक्रार करणाऱ्या अकादमी मालकाचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, प्रमोद यांची सेमिनरी हिल्स येथील श्री बालाजी मंदिरजवळ द नागपूर डिस्ट्रिक्ट इक्वेस्ट्रियन असोसिएशन हॉर्स रायडिंग अकादमी असून एकंदर 17 घोडे या ठिकाणी आहेत. यात 9 घोडे तर 8 घोड्या आहेत. घोडेस्वारीचे प्रशिक्षण देण्याचे काम या अकादमीत केले जाते. 17 मे रोजी रात्री साडेअकरा वाजताच्या सुमारास त्यांना त्यांच्या अकादमीमध्ये सुरक्षा रक्षक म्हणून कामाला असलेल्या रुस्तम याचा फोन आला. सुरज उर्फ छोट्या खोब्रागडे चोरी करुन पळून गेल्याचे सांगितले.
अकादमीत चोरी झाल्याचे समजताच तातडीने सकाळी 7 वाजता घटनास्थळी जाऊन बघितले असता प्रत्येकी 500 रुपयांचे असे एकंदर दोन हजार रुपयांचे चार लोखंडी एंगल चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. चोरीचे हे सीसीटीव्ही फुटेज बघताना मात्र अकादमी चालक प्रमोद लाडवे यांना धक्काच बसला. त्यांच्या अकादमीत असलेल्या इरा नामक घोडीच्या पिलाशी सूरजने अमानवी पद्धतीने, अनैसर्गिक कृत्य करण्याचा प्रयत्न केला. हा सर्व प्रकार बघून प्रमोद यांनी तातडीने गिट्टीखदान पोलिस स्टेशन गाठून तक्रार केली. पोलिसांनी आरोपीस ताब्यात घेतले आहे.