नागपूर : अल्युमिनियम कंपनीत भीषण आग  Pudhari Photo
नागपूर

नागपूर : अल्युमिनियम कंपनीत भीषण आग !

Nagpur Fire News | 6 कामगार जखमी, अनेकजण अडकल्याची भीती

पुढारी वृत्तसेवा

नागपूर : नागपूर जिल्ह्यातील उमरेड एमआयडीसी परिसरातील अल्युमिनियम फॉइल आणि पावडर तयार करणाऱ्या कंपनीत आज शुक्रवारी भीषण आग लागल्याची घटना घडली. अनेक कामगार अडकल्याची भीती व्यक्त होत असताना काही कामगार सुदैवाने बाहेर पडले. 6 कामगार जखमी झाले असून दोघांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे. या कंपनीचे नाव एमएमपी असे असून रात्री सात साडेसातच्या सुमारास स्फोटानंतर ही आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे. जखमींना नागपुरातील मेडिकल कॉलेज शासकीय रुग्णालयात उपचारासाठी आणण्यात आले आहे.

नागपूर जिल्ह्यातील उमरेडमधल्या अल्युमिनियम फॉइल आणि पावडर तयार होणाऱ्या या केमिकल कंपनीमध्ये आज सायंकाळी स्फोट झाला. यात 6 जण जखमी झाले असून 2 जण गंभीर जखमी आहेत. त्यांना नागपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हलवण्यात आले आहे. महत्वाचे म्हणजे या कंपनीमध्ये अल्युमिनियम पावडर असल्याने ही आग विझवता येत नाही. पावडर जळून खाक झाल्यानंतरच ही आग विझेल अशी माहिती उमरेड पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक धनाजी जळक यांनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT