नागपूर : आज सोमवारी पुन्हा एकदा महाल गांधीगेट परिसरात भाजप,काँग्रेस आमने सामने आल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले. काँग्रेस भ्रष्टाचारी आहे असा आरोप करीत नॅशनल हेरॉल्ड प्रकरणावरून गांधीगेट परिसरात आंदोलन केल्यानंतर भाजप पदाधिकारी,कार्यकर्ते शहर जिल्हा काँग्रेस कार्यालय देवाडिया भवनाच्या दिशेने जाण्याच्या प्रयत्नात असताना पोलिसांनी त्यांना रोखले.
दुसरीकडे काँग्रेसचे कार्यकर्तेही या आंदोलनाच्या प्रत्युत्तरात रस्त्यावर उतरल्याने तणावाची स्थिती निर्माण झाली. 17 मार्च रोजी विश्व हिंदू परिषद, बजरंग दल आदी हिंदुत्ववादी संघटनांनी औरंगजेबाची कबर हटविण्याच्या मागणीवरून तीव्र आंदोलन केले. औरंगजेबाचा प्रतिकात्मक कबर, पुतळा जाळला. मात्र, काही वेळातच या आंदोलनानंतर दोन गट आमने सामने आले.
काँग्रेसने अलीकडेच या संदर्भात महाल परिसरात सद्भावना रॅली काढली. या रॅलीवर काँग्रेसने सडकून टीका केली. यामुळे आज या आंदोलनानंतर महाल परिसरात सर्वसामान्यांमध्ये पुन्हा काहीशी चिंता दिसली.