Fraud Pudhari News
नागपूर

Nagpur Fraud | ५५ लाखांचा माल खरेदी करून १०.७९ लाख थकविले; लुधियानातील व्यापाऱ्यावर गुन्हा

थकीत रक्कम मागितल्यावर नागपुरातील व्यापाऱ्याला शिवीगाळ व धमकी; तहसील पोलिसांत तक्रार

पुढारी वृत्तसेवा

Business Cheating Case Nagpur

नागपूर :  व्यावसायिक व्यवहाराच्या नावाखाली लाखो रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार नागपुरात उघडकीस आला आहे. तब्बल ५५ लाख ९० हजार रुपयांचा सब्लिमेशन पेपर खरेदी केल्यानंतर त्यापैकी १० लाख ७९ हजार १६६ रुपये थकविल्याचा आरोप लुधियानातील एका व्यापाऱ्यावर करण्यात आला आहे. थकीत रकमेची मागणी केल्यानंतर संबंधित व्यापाऱ्याने शिवीगाळ करून धमकी दिल्याची तक्रारही करण्यात आली आहे. या प्रकरणी तहसील पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

नागपुरातील जागनाथ बुधवारी परिसरातील रहिवासी अनिकेत राजेश येठिया हे सब्लिमेशन पेपरच्या खरेदी-विक्रीचा व्यवसाय करतात. त्यांच्या तक्रारीनुसार, लुधियाना येथील चिनाब डोजिया मिल्सचे प्रोप्रायटर चेतन टंडन यांनी ऑनलाइन माध्यमातून त्यांच्याकडून ५५ लाख ९० हजार रुपयांचा सब्लिमेशन पेपर खरेदी केला होता. या व्यवहारापोटी आरोपीने ४५ लाख ११ हजार रुपये अदा केले. मात्र, उर्वरित १० लाख ७९ हजार १६६ रुपये देण्यास टाळाटाळ केली.

वारंवार मागणी करूनही थकीत रक्कम मिळत नसल्याने अनिकेत येठिया यांनी आरोपीशी फोनवरून संपर्क साधला. यावेळी पैसे देण्याऐवजी आरोपीने कथितरीत्या अश्लील शिवीगाळ करून धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद आहे. अखेर येठिया यांनी तहसील पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी चेतन टंडन यांच्याविरुद्ध फसवणुकीसह संबंधित कलमांनुसार गुन्हा नोंदविला असून, पुढील तपास सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT