नागपूर; पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष कुणाल राऊत यांना प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी यांनी जामीन मंजूर केला आहे. राऊत याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे बॅनर विद्रूप केल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे लोककल्याणकारी बॅनर विद्रूप केल्याप्रकरणी भादवि कलम ४२७, ४३७, १४३, १२० व सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान प्रतिबंधक कायदा कलम ३ व मुंबई पोलीस कायद्याच्या विविध कलमाअंतर्गत गुन्हा नोंदवित कुणाल राऊत याला अटक करण्यात आली होती. आज (दि. ७) न्यायालयाने पोलिसांच्या वाढीव पोलीस कस्टडीची मागणी फेटाळुन लावत आरोपीस न्यायिक कोठडीमध्ये घेत २५ हजार रुपयांच्या जातमुचलका व 10 हजार रुपयांच्या रोख जमानतीसह जामीन मंजूर केला. राऊत यांचे तर्फे ॲड. कमल सतुजा, ॲड. रोशन बागडे, ॲड. कैलाश डोडानी आणि ॲड. दिपेन जग्यासी यांनी युक्तिवाद केला.