नागपूर - कोराडी येथील औष्णिक विद्युत केंद्र येथील, ६६० मेगावॅट संच क्र. ८ च्या एच.पी. हिटरच्या स्टार्टअप व्हेंट फ्लॅंजमध्ये गळतीची दुरूस्तीचे कार्य महानिर्मिती कर्मचार्यांच्या आणि कंत्राटी कामगारांकडून सुरू असतांना अचानक वाफ बाहेर पसरली. यात एका तंत्रज्ञासह तीन कामगार किरकोळ जखमी झाले.
या सर्वांना प्रथम महानिर्मितीच्या रुग्णालयात प्रथमोपचार करण्यात आले. यातील दोघांना सीएसआयसीचा दवाखाना असलेल्या आशा हॉस्पिटल कामठी येथे नेण्यात आले. या सर्वांवर प्रथमोपचार करून सर्वांना सुट्टी देण्यात आली. या घटनेत कुठलिही मोठी हानी झाला नाही.आज सकाळी साडेनऊ वाजता ही घटना घडली. रवींद्र नांदुरकर, राहुल खेडेकर, शैलेश मेश्राम, विनोद कांबळे या कामगारांचा समावेश आहे. एका कामगाराच्या पायावर ही वाफ आली इतर तीन लोकांना किरकोळ स्वरूपाची दुखापती या वाफेने झाली. दरम्यान,साइटवर काम करणारे कर्मचारी आणि कंत्राटी कामगार तात्काळ बाजूला झाले अनर्थ टळला.
दक्षता घेऊ
अशा प्रकारच्या घटना भविष्यात होऊ नये तसेच कामगारांनी देखभाल दुरुस्ती करताना सावधगिरीने करावी. अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी संबंधितांना सूचना देऊन अधिक काळजी घेण्यात येईल असे मुख्य अभियंता विलास मोटघरे यांनी स्पष्ट केले.