Steam Leak Koradi Nagpur  Pudhari
नागपूर

Koradi Power Plant Accident | कोराडी वीज प्रकल्पात वाफेमुळे ८ अधिकारी, कर्मचारी जखमी, एकाची प्रकृती चिंताजनक

कोराडी औष्णिक वीज केंद्रातील संच १० बंद असताना सुमारे १३ मीटर उंचीवरील मजल्यावर अचानक बॉयलर मधील पीप होलमधून वाफ बाहेर

पुढारी वृत्तसेवा

Steam Leak Koradi Nagpur

नागपूर : कोराडी वीज प्रकल्पात वाफेमुळे 8 अधिकारी, कर्मचारी, कंत्राटी कामगार जखमी झाल्याची घटना घडली. चार जणांना उपचारानंतर सुटी देण्यात आली असून चार गंभीर जखमींवर उपचार सुरू आहेत. एकाची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे. सोमवारी (दि. १३) सकाळी अंदाजे साडेदहाच्या सुमारास ही घटना घडली.

कोराडी औष्णिक वीज केंद्रातील संच १० बंद असताना सुमारे १३ मीटर उंचीवरील मजल्यावर अचानक बॉयलर मधील पीप होलमधून वाफ बाहेर आल्याने ८ जणांना गंभीर दुखापत झाली. या घटनेत 4 अधिकारी, कर्मचारी तर चार कंत्राटी कर्मचारी जखमी झाले.

जखमीमध्ये सचिन भागेवार, विवेक पाटील, तेजस सोनवणे, ए.के. काझी, निखिल जायतगुडे, कमलेश बारमटे, गुलाबसिंग टिकाम आणि विलास बनसोड अशी जखमींची नावे आहेत. सर्व जखमींना तातडीने नागपुरातील खासगी हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले.

प्राथमिक उपचारानंतर सचिन भागेवार, तेजस सोनवणे व विलास बनसोड यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. ए.के. काझी यांना आज सायंकाळपयȊत सुटी दिली जाईल, असे समजते. उर्वरित ४ गंभीर जखमीवर वैद्यकीय उपचार सुरू आहेत. उपचाराचा खर्च महानिर्मिती करणार असून घटनेचे सेफ्टी ऑडिट केले जाणार आहे. प्रथमदर्शनी नियमांचे कोणतेही उल्लंघन झालेले नसल्याचा दावा महानिर्मितीने केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT