Love Affair Tragedy Boyfriend Arrested  Pudhari
नागपूर

Nagpur Crime | प्रेमसंबंधातून तरुणीने उचलले टोकाचे पाऊल; प्रियकराला अटक

लग्नास नकार देत मानसिक त्रास दिल्याचा कुटुंबीयांचा आरोप; कळमना पोलिसांची कारवाई

पुढारी वृत्तसेवा

Love Affair Tragedy Boyfriend Arrested

नागपूर : प्रेमसंबंधातून निर्माण झालेल्या वादानंतर १९ वर्षीय तरुणीने घरी गळफास घेऊन जीवन संपविल्याची घटना कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. या प्रकरणी तरुणीच्या कुटुंबीयांच्या तक्रारीवरून पोलिसांनी तिचा २० वर्षीय प्रियकर आशीष युवराज शिल्लारे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तरुणीचे इंदिरानगर परिसरातील आशीष शिल्लारे याच्यासोबत गेल्या वर्षभरापासून प्रेमसंबंध होते. दोघांमध्ये फोनवरून नियमित संपर्क तसेच भेटीगाठी होत होत्या. मात्र, आशीष लग्नासाठी तयार नसल्याचा आरोप तरुणीच्या कुटुंबीयांनी केला आहे. तसेच, त्याने तरुणीला लग्न करणार नसल्याचे सांगून मानसिक त्रास दिल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

७ सप्टेंबरच्या रात्री दोघांमध्ये वाद झाला. त्यानंतर तरुणीने आशीषसोबत फोनवरून संवाद साधला. काही वेळाने तिने राहत्या घरी गळफास घेतला. या घटनेनंतर कुटुंबीयांनी कळमना पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी आशीष शिल्लारे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT