नागपूर - नियमित सोने खरेदी करीत आणि पैसे देत विश्वास संपादन केल्यानंतर गेल्या वर्षभरात दोन किलो 148 ग्राम सोने, दागिने खरेदी केले मात्र त्यापोटी दिलेले एयू स्मॉल फायनान्स बँकेचे दोनही धनादेश न वटल्याने एका सराफा व्यावसायिकाची सुमारे 2 कोटी 34 लाख 9 हजार रुपयांनी फसवणूक करण्यात आली आहे.
याप्रकरणी प्रतापनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जयंत वसंतराव पालकर वय 49 राहणार संभाजीनगर चौक, त्रिमूर्ती नगर यांचे श्री सप्तशृंगी ज्वेलर्स नावाने सोने, चांदी दागिने विक्रीचे दुकान आहे. दरम्यान गंडा घालणारे राहुल नरेशचंद्र खाबिया उर्फ जैन राहणार नलावडे लेआउट यांचा मका खरेदी विक्रीचा व्यवसाय आहे. जैन यांनी पालकर यांच्या दुकानातून वेळोवेळी सोन्याचे दागिने खरेदी केली. नियमितपणे पैसे देत असल्याने पालकर यांचा बडा आसामी आपला ग्राहक असल्याचे वाटून त्याच्यावर विश्वास बसला. मात्र फेब्रुवारी 2024 ते मार्च 4 मार्च 2025 या कालावधीत जैन यांनी पालकर यांच्याकडून तब्बल दोन किलो 148 ग्रॅम सोन्याचे दागिने खरेदी केले व त्यांना एयू स्मॉल फायनान्स कंपनी बँकेचा धनादेश दिला. अर्थातच हा धनादेश वटला नाही. तांत्रिक कारण देत त्याने पुन्हा दुसरा धनादेश दिला मात्र तोही न वटल्याने सराफा व्यावसायिक पालकर यांनी अखेर जैन यांना रोख पैसे मागितले मात्र त्यांनी ते पैसे देण्यास वारंवार टाळाटाळ केली.अखेर पालकर यांनी प्रताप नगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली