Itwari Sarafa Bazar Theft  AI PHOTO
नागपूर

Nagpur Jewellery Shop Theft | ग्राहक बनून आली अन् सोन्याचे पेंडंट केले लंपास; इतवारीतील कक्कड ज्वेलर्समध्ये चोरी

६० वर्षीय महिलेने नजर चुकवून १ लाख ९ हजारांचे पेंडंट केले गायब; सीसीटीव्हीच्या आधारे तहसील पोलिसांचा शोध सुरू

पुढारी वृत्तसेवा

Itwari Sarafa Bazar Theft

नागपूर : नागपूर  इतवारी सराफा बाजारातील कक्कड ज्वेलर्समध्ये ग्राहक बनून आलेल्या सुमारे ६० वर्षीय महिलेने नजर चुकवून १ लाख ९ हजार रुपये किमतीचे सोन्याचे पेंडंट लंपास केल्याची घटना समोर आली आहे. ३१ ऑगस्ट रोजी दुपारच्या सुमारास ही चोरी झाली. याप्रकरणी तहसील पोलिसांनी अज्ञात महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कक्कड ज्वेलर्समध्ये लेखा व्यवस्थापक म्हणून कार्यरत असलेले अनिल महाजन यांनी याबाबत पोलिसांत तक्रार दाखल केली. ३१ ऑगस्ट रोजी दुपारी सुमारे ६० वर्षीय महिला सोन्याचे दागिने खरेदी करण्याच्या बहाण्याने दुकानात आली होती. तिने दुकानातील विविध दागिने पाहण्यास सुरुवात केली.

दागिने पाहत असताना संबंधित महिलेने दुकानातील कर्मचाऱ्यांची नजर चुकवून ७.८२ ग्रॅम वजनाचे सोन्याचे पेंडंट हातोहात लंपास केले. काही वेळानंतर दुकानातील दागिन्यांची तपासणी केली असता संबंधित पेंडंट गायब असल्याचे व्यवस्थापनाच्या लक्षात आले. त्यानंतर दुकानातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले.

सीसीटीव्हीत महिलेच्या हालचाली कैद

सीसीटीव्ही चित्रणात संशयित महिलेच्या हालचाली कैद झाल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. त्याआधारे तहसील पोलिसांकडून महिलेची ओळख पटवून तिचा शोध घेण्यात येत आहे. तसेच चोरीला गेलेले सोन्याचे पेंडंट आणि आरोपी महिलेचा ठावठिकाणा शोधण्यासाठी पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT