उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नागपूर जिल्ह्याचा दूरदृष्यप्रणालीद्वारे आढावा घेतला.  Pudhari Photo
नागपूर

नागपूर जिल्ह्यातील नाविण्यपूर्ण योजना इतर जिल्ह्यांसाठी अनुकरणीय : अजित पवार

Ajit Pawar | नागपूरसाठी सकारात्मक निर्णय घेऊ

पुढारी वृत्तसेवा

नागपूर, पुढारी वृत्तसेवा : पर्यटन क्षेत्रातील नागपूर जिल्ह्याला उपलब्ध असलेली संधी लक्षात घेऊन नाविण्यपूर्ण योजनेंतर्गत विविध विकास कामांचे चांगले नियोजन नागपूर जिल्ह्यामार्फत झाले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली नागपूर जिल्ह्यासाठी भविष्यातील गरजा ओळखून विविध नाविण्यपूर्ण योजना इतर जिल्ह्यांसाठी अनुकरणीय आहेत. पथदर्शी उदाहरण म्हणून याकडे पाहता येईल, अशा शब्दांत राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी कौतुक केले. वाढीव निधीबाबत बोलताना जिल्ह्याचा आढावा घेतल्यानंतर नागपूरची गरज लक्षात घेता सकारात्मक निर्णय घेऊ, असे त्यांनी सांगितले.

जिल्हा नियोजन समितीच्या राज्यपातळीवरील आढावा बैठकीत त्यांनी नागपूर जिल्ह्याचा दूरदृष्यप्रणालीद्वारे आढावा घेतला. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, वित्त राज्यमंत्री आशिष जयस्वाल, सर्वश्री आमदार कृष्णा खोपडे, चरणसिंग ठाकूर, मनपा आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी, विभागीय अपर आयुक्त डॉ. माधवी खोडे, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. गजभिये, जिल्हा नियोजन अधिकारी राजेश गायकवाड आदी मान्यवर व अधिकारी उपस्थित होते.

सन 2025-26 या आर्थिक वर्षाचा नागपूर जिल्ह्याच्या सर्वसाधारण योजनेचा रुपये 1 हजार 611 कोटी 98 लक्ष 68 हजार एवढा प्रारुप आराखडा आहे. या आराखड्याला महसूल मंत्री तथा नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत नुकतीच मंजूरी प्रदान करण्यात आली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत जिल्ह्याला अधिक निधी मिळावा, अशी मागणी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे व वित्त राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी केली.

नागपूर जिल्ह्यात रुग्णालयाचे बांधकाम, विस्तारीकरण, पर्यटन विकासासाठी मूलभूत सुविधा, वन पर्यटन, इको टूरिझम, यात्रा स्थळांचा विकास, कोलीतमारा ते नवेगाव खैरीपर्यंत बोट सफारी, बालोद्यान, एटीव्ही वाहने, पॅरामोटरिंग, हॉट एअर बलून, सायकल सफारी, डॉर्क स्कॉय सॅनच्युरी, पर्यटन,दवाखाना आपल्या दारी, मोबाईल ऑय स्कीनींग बस, मलनिस्सारण प्रकल्प, डिजीटल क्लास रुम, गॅस शवदाहिनी आदी नाविण्यपूर्ण योजनांची माहिती जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी सादरीकरणाद्वारे दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT