पोटच्या मुलाने केली आई-बापाची हत्या केल्याची घटना नागपूरमध्ये घडली. Pudhari Photo
नागपूर

नागपूर हादरले ! पोटच्या मुलाने केली आई-बापाची हत्या!

कपिल नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घटना

पुढारी वृत्तसेवा

नागपूर : सर्वत्र नववर्षाचे स्वागत होत असताना कपिल नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत आज (दि.१) पती-पत्नीचे एकाचवेळी मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. दोघांच्या आत्महत्येचा देखावा करण्यात असला तरी त्याची पोटच्या मुलानेच हत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. अरुणा डाखोळे असे मृत आईचे नाव असून त्या शिक्षिका होत्या. तर लीलाधर डाखोळे असे वडिलांचे नाव असून ते महाजेनको खापरखेडा येथे नोकरीला होते.

अभियांत्रिकीचा विद्यार्थी असलेल्या मुलाने शिक्षिका आईची गळा दाबून तर टेक्निशियन असलेल्या पित्याची चाकूने हत्या केली. २६ डिसेंबर रोजी घडलेल्या या घटनेचा उलगडा आज (बुधवारी) झाला. मुलाने हत्येची कबूली दिली असून ही हत्या का केली, याचा उलगडा तपासात आणि मृत्यूचे खरे कारण शवविच्छेदन अहवालातच उघड होईल, अशी माहिती डीसीपी निकेतन कदम यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

मुलाने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, २६ डिसेंबरला दुपारी एकच्या सुमारास त्याने आईचा गळा दाबून खून केला. त्यानंतर तो वडिलांची प्रतीक्षा करीत होता. सायंकाळी ५ च्या सुमारास वडील येताच त्याने वडिलांची चाकूने हत्या केली.

विशेष म्हणजे उत्कर्ष नावाच्या या मुलाने आपल्या बहिणीला आणि काकांना आई-बाबा मेडिटेशन साठी बंगलोरला गेले असून ते ५ जानेवारीला नागपुरात परत येतील, अशी बतावणी केली. कुणाला संशय येऊ नये, म्हणून तो घरच्या कारने रोज बहिणीला कॉलेजमध्ये नेऊन सोडत होता व कॉलेज बाहेरच थांबून तिला ती घरी येऊ नये, म्हणून काकांच्या घरी सोडून देत होता. स्वतः देखील तो या काळात त्यांच्याकडे राहिल्याची माहिती त्याने दिली. एकंदरीत अतिशय पूर्वनियोजितपणे त्याने आपल्या आई - वडीलांची हत्या केली. घरात सर्वत्र रक्ताचे पडलेले डाग लक्षात घेता यात आणखी कुणाचा हात आहे का? याविषयीची माहिती पुढील तपासात अधिक उघड होण्याची शक्यता आहे. सलग सहा वर्ष अभियांत्रिकीला शिकत असताना तो परफॉर्मन्स चांगला नसल्याने त्याने इतरत्र शिक्षण घ्यावे, अशी आई-वडिलांची इच्छा होती. अन्यथा शेतीकडे लक्ष दे असाही तगादा ते लावत असल्याची माहिती या प्रकरणी पुढे आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT