नागपूर - ओम साई नगर कलमना येथील सफान सुगंध भंडार या अगरबत्ती कारखान्याला आणि वर्धमान नगरातील फोमच्या एका दुकानाला लागलेल्या भीषण आगीने आज रविवारी रात्री तारांबळ उडविली.
अगरबत्ती कारखान्यातील कच्चा माल, भुसा आणि इतर साहित्य असा सुमारे साडेपाच लाख रुपयांचा मुद्देमाल जळून खाक झाला कलमना,लकडगंज, सुगत नगर येथील अग्निशमन वाहनांनी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळविले.
दरम्यान , दाट वस्तीत असलेल्या विधी इंडस्ट्रीज या सोफा फर्निचर,फोमच्या दुकानाला लागलेली आग खूपच झपाट्याने पसरली. सुमारे 25 लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे सांगण्यात येते. या भीषण आगीतही पहिल्या माळ्यावरून एका लॅब्रो श्वानाची सहीसलामत सुटका करण्यात अग्निशमन विभागाच्या जवानांना यश आले तर सुमारे 10 लाखांची साहित्याची बचत केल्याची माहिती. अग्निशमन विभागाने दिली.