Girl assaulted Nagpur
नागपूर : एकतर्फी प्रेमातून एका युवकाने अल्पवयीन विद्यार्थिनीवर हातोडा व कटरने वार करून तिला ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना इमामवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत अशोक चौक परिसरात घडली. पोलिसांनी हल्लेखोर युवकाला अटक केली असून सुरज कृष्णा प्रसाद शुक्ला (वय 26, रा. इमामवाडा) असे या युवकाचे नाव आहे.
17 वर्षीय अल्पवयीन मुलगी आयटीआयमध्ये शिकत असून सुरज मनपात कंत्राटी कर्मचारी आहे. यापूर्वी अजनी हद्दीत एकतर्फी प्रेमातून खुनाची घटना घडली. या घटनेने पालकांमध्ये दहशत आहे. एकतर्फी प्रेमातून तो तिचा नेहमी पाठलाग करायचा. दोन दिवसापूर्वी पायी जात असताना सरोजने तिचा पाठलाग केला. तू मला खूप आवडते. मी तुझ्यावर प्रेम करतो. तू माझ्यावर प्रेम करते का...? असा तो तिला म्हणाला. मात्र, तिने स्पष्ट नकार दिला.
घरी परतल्यावर तिने आई-वडिलांना ही घटना सांगितली. आई-वडील सुरजच्या घरी गेले. सुरज मुलीला त्रास देत असल्याची माहिती पालकांना दिली. समजूत घातल्यानंतर त्याने पुन्हा असे करणार नाही, अशी ग्वाही दिली. मात्र, आपल्या आई-वडिलांना तू का सांगितले. म्हणून सूरज पुन्हा संतापला. सोमवारी सकाळी ती पायी जात असताना अशोक चौक परिसरात त्याने तिला अडवले. 'तू माझी नाही, तर कोणाची होणार नाही, असे फिल्मी स्टाईल म्हणत त्याने तिच्या डोक्यावर हातोड्याने तर गळ्यावर कटरने वार केला.
मदतीसाठी नागरिक धावले, मुलीला मेडिकलमध्ये दाखल केले. तोवर तो पळून गेला. मुलीच्या आई-वडिलांनी पोलिसात तक्रार दिली. अटकेच्या भीतीने तो अटकपूर्व जामीन मिळविण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, जामीन मिळवण्यात अपयशी ठरल्याने इमामवाडा पोलीस ठाण्यात आत्मसर्पण केले. न्यायालयीन कोठडी अंतर्गत त्याची कारागृहात रवानगी करण्यात आली.