Nagpur News : अवैध उत्खननावेळी तहसीलदाराच्या जीवाला धोका निर्माण करणाऱ्या जेसीबी मालक आयुर थोटे यास अखेर अटक 
नागपूर

Nagpur News : अवैध उत्खननावेळी तहसीलदाराच्या जीवाला धोका निर्माण करणाऱ्या जेसीबी मालक आयुर थोटे यास अखेर अटक

5 मे च्या रात्री घडली होती थरारक घटना, कारवाईवेळी जेसीबी वेगाने ने

पुढारी वृत्तसेवा

नागपूर - कुही तालुक्यातील वेलतूर पोलीस स्टेशन अंतर्गत मौजा बोरी (नाईक) येथे अवैध मुरुम/माती उत्खनन व वाहतुकीच्या कारवाईमध्ये नायब तहसिलदार बुद्धभूषण निकाळजे यांच्या जीवाला धोका निर्माण करणाऱ्या जेसीबीचा मालक व चालक आयुर थोटे याला अटक करुन त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दिनांक 5 मेच्या रात्री घडलेल्या या थरारक घटनेत नायब तहसिलदार निकाळजे यांनी धैर्य दाखवून केलेल्या कारवाईबद्दल जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी कौतूक करुन अशा गुन्हेगारांविरुद्ध कठोर कारवाईचे आज गुरुवारी निर्देश दिले. वरीष्ठ महसूल अधिकाऱ्यांची तातडीची बैठक बोलावून जिल्ह्यात अवैध मुरुम / माती उत्खनन करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्याची मोहीम अशीच सुरु ठेवण्याचे स्पष्ट निर्देश दिले. या बैठकीस अपर जिल्हाधिकारी प्रवीण महिरे, निवासी उपजिल्हाधिकारी अनूप खांडे, सर्व उपविभागीय अधिकारी व जिल्हा खनिकर्म अधिकारी अतुल दोड आदी उपस्थित होते.

अवैध उत्खनन करणाऱ्या जेसीबी चालक-मालक आयुर थोटे याला मौजा बोरी येथे रंगेहात पकडल्यानंतर त्याने वेगाने त्याची जेसीबी 3 किलोमीटर पर्यंत घटनास्थळावरुन दूर नेली. जेसीबीवर कारवाई करण्यासाठी चढलेले नायब तहसिलदार निकाळजे यांनी जीव मुठीत घेऊन जेसीबी चालकाला जेसीबी थांबविण्यास सांगितले. मात्र त्याने बेदरकारपणे जेसीबी चालवून त्यांच्या बोलण्याकडे लक्ष न देता अप्रत्यक्ष व प्रत्यक्ष त्यांच्या जिविताला धोका निर्माण केला. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होताच विरोधकांनी सरकारला घेतले. अखेर शासनाने गंभीर दखल घेतली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT