नागपूर : चारित्र्याच्या संशयातून पतीने आपल्या भावाच्या मदतीने डॉक्टर पत्नीची हत्या केल्याची घटना हुडकेश्वर पोलीस स्टेशन हद्दीत लाडीकर लेआऊट येथे आज रविवारी उघडकीस आली. मृतक महिलेची बहीण डॉ श्रीमती निमा सोनार (वय 42 वर्ष रा नरेंद्र नगर) यांनी यासंदर्भात दिलेल्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला. मृतक डॉ. सौ अर्चना अनिल राहुले (वय 50 वर्षे रा प्लॉट नंबर 67 लाडीकर ले आऊट) ही महिला मेडिकल शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात असिस्टंट प्रोफेसर म्हणून फिजीओथेरपी विभागात कार्यरत आहेत. मृतकाचे पती डॉ. अनिल शिवशंकर राहुले वय 51 वर्षे हे रायपुर इंस्टीट्यूट ऑफ मेडिकल रायपूर, छत्तीसगढ़ येथे असिस्टंट प्रोफेसर म्हणून कार्यरत आहेत. या दाम्पत्याला एक मुलगा असून तो देखील करीम नगर तेलंगाना येथे एमबीबीएस तृतीय वर्ष शिक्षण घेत आहे.
अर्चना हिला मारल्यानंतर डॉक्टर पती पुन्हा रायपूरला निघून गेला आणि आल्यानंतर कुणीतरी हत्या केल्याचा बनाव केला. आपण 9 एप्रिल रोजी बुधवारला रात्री 11 वाजता फोन केला. मृतकाने फोन उचलला नाही. गुरुवार आणि शुक्रवारी सुध्दा फोन न उचलल्याने काल 12 एप्रिल रोजी रात्री 9 वाजताचे दरम्यान रायपूरवरून घरी आल्यावर त्यांना घराचे दार उघडे दिसले. आत जावून पाहिले असता बेडरूममध्ये दुर्गंधी होती. पोलिसांनी केलेल्या तपासात हा खून आरोपी मृतकाचे पती डॉक्टर अनिल राहुले व त्याचा भाऊ राजू राहुले वय 58 रा खैरलांजी, साकोली यांनी मिळून चारित्र्याच्या संशयावरून केला असे प्राथमिक तपासात उघडकीस आले. या गुन्हयात वापरलेले शस्त्र, लोखंडी रॉड जप्त करण्यात आले असून डोक्यात लोखंडी रॉड मारून ही हत्या करण्यात आली आहे. या दोन्ही आरोपीची 17 एप्रिल पर्यंत पोलिस कोठडी घेण्यात आली आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास झोन 4 पोलिस उपायुक्त श्रीमती रश्मिता राव, नरेंद्र हिवरे यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर भेदोडकर, पोलिस निरीक्षक नागेश चतरकर आणि सहकारी करीत आहेत.