Nagpur illegal liquor factory
नागपूर: विदर्भात मध्यप्रदेशातून मोठ्या प्रमाणावर दारू तस्करी सुरू असून हुडकेश्वर पोलीस स्टेशन अंतर्गत बेसा येथील (रो-हाऊस, प्लॉट नं. 38 क्रिष्णा रॉयल, न्यू हनुमान नगर) येथे राज्य उत्पादन शुल्क नागपूर विभागाने बनावट देशी-विदेशी दारु निर्मितीच्या अवैध कारखान्यावर छापा टाकून कारवाई केली. बनावट देशी, विदेशी दारुसह सुमारे 12 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
राज्य उत्पादन शुल्क आयुक्त राजेश देशमुख, सहआयुक्त प्रसाद सुर्वे, विभागीय उपआयुक्त गणेश पाटील, तसेच राज्य उत्पादन शुल्क नागपूरचे अधीक्षक सुरजकुमार रामोड यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. बेसा येथील घटनास्थळी दारु व तयार करण्याकरिता वापरलेले स्पिरीट 200 लीटर, विदेशी दारुचा तयार ब्लेंड 175 लीटर, बनावट देशी दारु 513 बल्क लिटर, देशी दारु तयार करण्यासाठी लागणारे इसेन्स 10 लीटर, बनावट रॉकेट देशी दारु नावाचे कागदी लेबल, जिवंत पत्री बुचे रिकाम्या बाटल्या, बनावट रॉयल स्टॅग विदेशी दारुचे जिवंत प्लॉस्टीक बुचे, रिकाम्या बाटल्या, एक दुचाकी वाहन व इतर साहित्य असे एकूण 11,93,082 रूपये किंमतीचा मुद्देमाल मिळून आला.
या धडक कारवाईत मनिष नंदकिशोर जयस्वाल (वय 48), विशाल शंभू मंडळ (वय 28) यांना अटक करण्यात आली. फरार आरोपींचा शोध सुरु आहे. ही कारवाई विभागीय भरारी पथकाचे निरीक्षक दशरथ क्षीरसागर, दुय्यम निरीक्षक, जगदीश यु पवार, मिलींद व लांबाडे, तसेच मंगेश कावळे निरीक्षक, दुय्यम निरीक्षक अमित. वा. क्षिरसागर, बळीराम ईथर यांनी सहकार्य केले. जवान गजानन राठोड, राहुल सपकाळ, सुधीर मानकर, किरण वैध, सचिन आडोळे, विनोद डुंबरे यांनी केली. पुढील तपास राज्य उत्पादन शुल्कचे निरीक्षक दशरथ क्षीरसागर करीत आहेत.