Electricity Theft | वीज चोरी File Photo
नागपूर

Electricity Theft Nagpur | हॉटेल मालकाकडून लाखो रुपयांची वीज चोरी उघड

भालदारपुरा परिसरातील एका हॉटेलमध्ये सुरू असलेली लाखो रुपयांची वीज चोरी उघडकीस

पुढारी वृत्तसेवा

Power Theft Case

नागपूर: शहरात वीज चोरीविरोधात महावितरणने धडक मोहीम हाती घेतली असून, भालदारपुरा परिसरातील एका हॉटेलमध्ये सुरू असलेली लाखो रुपयांची वीज चोरी उघडकीस आली आहे. या प्रकरणी गणेशपेठ पोलीस ठाण्यात भारतीय विद्युत कायदा २००३ सुधारित २००७ च्या कलम १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नंदनवन उपविभागाचे सहाय्यक अभियंता श्रीकांत बहादुरे आणि त्यांच्या पथकाने भालदारपुरा येथील 'लकी चिकन हॉटेल'वर छापा टाकला. यावेळी हॉटेलचे मालक ताज मोहम्मद आमीर मोहम्मद शेख (ग्राहक क्र. ४१००१७००७८५१) यांच्या व्यवसायाची तपासणी करण्यात आली.

पथक घटनास्थळी पोहोचले असता सुरुवातीला हॉटेलचे दार उघडण्यास टाळाटाळ करण्यात आली. मात्र, संशय बळावल्याने पथकाने परिसराची बारकाईने पाहणी केली.तपासणीदरम्यान असे आढळले की, हॉटेलच्या मागील बाजूस असलेल्या महावितरणच्या रोहित्रातून (ट्रांसफॉर्मर) ५० एमएमची काळ्या रंगाची वायर थेट टाकून वीज पुरवठा घेण्यात आला होता. मीटरला बगल देऊन थेट वायरद्वारे ही वीज चोरी केली जात असल्याचे पथकाच्या निदर्शनास आले. या कारवाईत एकूण ११,२५१ युनिट्सची वीज चोरी झाल्याचे निष्पन्न झाले असून, त्याची अंदाजे किंमत २,५९,४४० रुपये इतकी आहे.

महावितरणने संबंधित ग्राहकाला वीज चोरीचे देयक बजावले आहे, तसेच नियमानुसार ४५,००० रुपयांची तडजोड रक्कम भरण्याबाबतही समज दिली आहे. या कारवाईत अतिरिक्त कार्यकारी अभियंता धीरज बारापात्रे, कार्यकारी अभियंता समीर टेकाडे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता पराग उके आणि इतर तांत्रिक कर्मचाऱ्यांचा सहभाग होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT