हिंगणा तालुक्यातील नागलवाडी येथील अंध विद्यालय परिसरात नागाचे दर्शन  Pudhari
नागपूर

Nagpur Snake News | अंध विद्यालयात ५ फूट लांबीचा नाग आढळल्याने खळबळ, विद्यार्थ्यांमध्ये भीती

हिंगणा तालुक्यातील नागलवाडी येथील अंध विद्यालय परिसरात नागाचे दर्शन

पुढारी वृत्तसेवा

Hingna Blind School Cobra

नागपूर: जिल्ह्यात हिंगणा तालुक्यातील नागलवाडी येथील अंध विद्यालय परिसरात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. काही विद्यार्थी नेहमीप्रमाणे मैदानात खेळत असताना अचानक सुमारे पाच फूट लांबीचा नाग प्रजातीचा साप त्यांच्या नजरेस पडला. साप दिसताच विद्यार्थ्यांमध्ये एकच भीतीचे वातावरण निर्माण झाले.विद्यार्थी घाबरून इकडे-तिकडे पळू लागले.

परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन कर्मचाऱ्यांनीही तत्काळ सर्पमित्र आकाश मेश्राम यांना बोलावले त्यांनी अत्यंत कौशल्याने या नागाला पकडले.

यानंतर त्या सापाला कोणतीही इजा न करता सुरक्षितपणे नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र काही काळासाठी विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT