vote file photo
नागपूर

Nagpur Graduate Constituency voting leave|खासगी आस्थापनांतील मतदारांना आता दोन ऐवजी चार तासांची विशेष सवलत

Nagpur graduate constituency voting leave | खासगी आस्थापनांतील मतदारांना आता दोन ऐवजी चार तासांची विशेष सवलत

पुढारी वृत्तसेवा

नागपूर - नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी शुक्रवार दि. २३ ऑक्टोबर रोजी सकाळी ८ ते दुपारी ४ या वेळेत मतदान होणार आहे. या निवडणुकीत मतदार म्हणून नोंदणी असलेल्या कर्मचाऱ्यांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी विशेष नैमित्तिक रजेची तरतूद आहे. खासगी आस्थापनांमध्ये काम करणाऱ्या नोंदणीकृत मतदारांना मतदानासाठी दोन तासाऐवजी आता चार तासांची विशेष सवलत देण्यात येणार आहेत. निर्देश निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी दिली आहेत

सामान्य प्रशासन विभागाच्या शासन निर्णयानुसार, पदवीधर व शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीत मतदार असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी विशेष नैमित्तिक रजेची तरतूद करण्यात आली आहे. ही रजा कर्मचाऱ्यांना अनुज्ञेय असलेल्या नैमित्तिक रजेव्यतिरिक्त असेल. संबंधित शासन निर्णय मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र यांच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. मंगळवार, दि. २७ ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT