नागपूर

Nagpur Graduate Constituency Election Result: अटीतटीच्‍या लढतीत काँग्रेसची बाजी, कराळे मास्तरांमुळे भाजपचे गणित फिस्कटले

Bjp Sudhakar Kohale Defeat भाजपचे उमेदवार सुधाकर कोहळे यांचा पराभव

पुढारी वृत्तसेवा

nagpur padvidhar nivadnuk nikal 2026

नागपूर : राज्यातील विधान परिषद निवडणुकीत सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघातील अटीतटीच्या लढतीत महाविकास आघाडी पुरस्कृत काँग्रेसचे उमेदवार अभिजित वंजारी यांनी विजय मिळवला आहे. दुसऱ्या क्रमांकाच्या पसंतीच्या मतांवर त्यांनी पहिल्या क्रमांकाची मते मिळवणाऱ्या भाजपचे उमेदवार सुधाकर कोहळे यांना मागे टाकत ही निवडणूक जिंकली.

या निवडणुकीत सुरुवातीपासूनच दोन्ही उमेदवारांमध्ये अटीतटीचा आणि चुरशीचा सामना पाहायला मिळाला. पहिल्या फेरीत भाजपचे सुधाकर कोहळे यांनी आघाडी मिळवली होती, मात्र आवश्यक कोटा पूर्ण न झाल्यामुळे दुसऱ्या पसंतीची मते मोजण्यात आली. दुसऱ्या पसंतीच्या मतांच्या फेऱ्यांमध्ये अभिजित वंजारी यांनी मुसंडी मारत कोहळेंवर मात केली आणि अखेर विजयावर शिक्कामोर्तब केले.

रात्री उशिरा अभिजित वंजारी यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, माझा विजय झाला आहे. किती मतांनी विजय झाला ते मतमोजणी केंद्रात आत जाऊन सांगतो. जो जिता वही सिकंदर..उद्या सकाळ पर्यंत अंतिम आकडेवारी सह निकाल येईल.

'नितेश कराळे आमचा लहान भाऊ आणि मित्र आहे. मी अगोदर पासून सांगत आहे की ही निवडणूक रणनीतीचा भाग आहे. त्यामुळे शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ ही मन खरी ठरली त्यामुळे आमचा आज विजय झाला आहे', असेही त्यांनी सांगितले.

दरम्यान, सुमारे पाच हजारांची कोहळे यांनी मिळविलेली आघाडी वंजारी यांनी भरून काढत  गेल्यावेळी काँग्रेसकडे गेलेला हा मतदारसंघ कायम ठेवला.

कराळे मास्तरांमुळे भाजप नापास

राष्ट्रवादी काँग्रेसने हकालपट्टी केल्यावरही 26 हजारांवर मते घेणारे नितेश कराळे मास्तर यांची भूमिका यात महत्वाची ठरली. अर्थातच याचा फायदा महाविकास आघाडीचे ॲड अभिजित वंजारी यांना मिळाला. एकसंघ काँग्रेस,48 संघटना आपल्यासोबत असल्याने विजय आमचा निश्चित होता. अर्थातच नागपूरचा निकाल कराळे मास्तर ,त्यांना मिळालेली दुसऱ्या पसंतीची मते ठरविणारा ठरला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT