नागपूर - मानकापूर गोरेवाडा रोडवरील पलोटी स्कूल परिसरात आज बुधवारी दुपारी एका अनियंत्रित कारने जोरदार धडक दिल्याने एका चिमुकलीचा गंभीर जखमी झाल्याने मृत्यू झाला. माहिरा अशफाक शेख असे या 9 वर्षीय मुलीचे नाव असून अपघातानंतर परिसरात तणावाची स्थिती निर्माण झाली आहे.
कारचे स्टिअरिंगमध्ये काही तांत्रिक बिघाड झाल्याने ही कार अनियंत्रित झाल्याची माहिती असून मानकापूर पोलिसांनी चालकाला ताब्यात घेतले आहे. गंभीर जखमी अवस्थेत या चिमुकलीला खासगी रुग्णालयात उपचारासाठी नेले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले.