Futala Lake paramotoring show
नागपूर: नागपूरच्या फुटाळा तलावाच्या आकाशात मंगळवारी (दि.४) रोमांचक दृश्य पाहायला मिळाले. प्रशिक्षित पायलटांनी फुटाळा तलाव, व्हेटरिनरी कॉलेज, सेमिनरी हिल, तेलनखेडी आणि भरतनगर परिसरावर थरारक पॅरामोटरींग उड्डाणांचे सादरीकरण केले.
या दृश्याने फुटाळा परिसरात नागरिकांची मोठी गर्दी जमली. नैसर्गिक सौंदर्य आणि वारसा यांचे दर्शन आकाशातून घडविण्याचे हे एक अनोखे माध्यम ठरले आहे. ही सर्व उड्डाण प्रकाश चिव्हे, अभय राठोड आणि सुभाष धुर्वे या प्रशिक्षित व प्रमाणित पायलटांनी केले. योग्य हवामान आणि सुरक्षिततेच्या सर्व उपायांसह आगामी काळात रामटेक येथून नियमित हवाई साहसी खेळ व पॅरामोटरींग उड्डाणे राबविण्याची योजना प्रस्तावित आहे. ज्यामुळे अधिकाधिक लोकांना पॅरामोटरींगचा अनुभव घेता येईल. नागपूर आणि परिसरातील निसर्गरम्य दृश्यांचा आनंद लोकांना हवेतून अनुभवण्याची संधी मिळेल.