Tiger Attack File Photo
नागपूर

Nagpur tiger news : अखेर 'ती' नरभक्षक वाघीण जेरबंद; उमरेड परिसरातील गावकऱ्यांचा सुटकेचा निश्वास

Maharashtra tiger attack : या घटनांमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते

पुढारी वृत्तसेवा

नागपूर : जिल्ह्यातील कुही परिसरात एका वाघाने केलेल्या हल्ल्यात जखमी झालेल्या वाघिणीला अखेर वनविभागाने जेरबंद केले आहे. आतापर्यंत अनेकांचा या वाघिणीमुळे मृत्यू झाला. कुही तालुक्यातील मौजे रुयाळ टेकेपार परिसरात ही मोहीम राबविण्यात आली. वाघिणीला जेरबंद करून पिंजऱ्यात ठेवण्यात आले.

नागपूर वनविभागांतर्गत उत्तर उमरेड वनपरिक्षेत्रातील मौजा रुयाळ परिसरात या वाघिणीने काही दिवसांपासून धुमाकूळ घातला होता. ६ जून रोजी तिने केलेल्या हल्ल्यात दिर्गाबर यांचा मृत्यू झाला होता. याआधी, २७ मार्च रोजी वेलतूर ते टेकेपार मार्गावर असलेल्या मौजा प्रतापपूर रिठी येथील शेतशिवारात निर्मला गभणे यांच्यावरही याच वाघिणीने हल्ला केल्याने त्यांचा मृत्यू झाला होता.

या घटनांमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे, या वाघिणीला पकडण्यासाठी वन विभागाने पुढाकार घेतला. सातत्याने गस्त, ट्रॅप कॅमेऱ्यांद्वारे निरीक्षण, हालचालींचे विश्लेषण याद्वारे तिच्यावर लक्ष ठेवण्यात आले. या वाघिणीची ओळख पटल्यावर तिला भूल देऊन जेरबंद करण्यात आले. नागपूर वनविभागाच्या उपवनसंरक्षक डॉ. विनिता व्यास व साहाय्यक वनसंरक्षक मनोज धनविजय यांनी मार्गदर्शन केले. वनपरिक्षेत्र अधिकारी नीलय भोगे, क्षेत्र साहाय्यक ओ. वी. चौरागडे, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. प्रियल चौरागडे, वनपाल अतुल राऊत यांच्यासह वनविभागाचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT