प्रातिनिधिक छायाचित्र  File Photo
नागपूर

नागपूर: धावत्या ट्रेनमध्ये हाणामारी; तरुणाचा मृत्यू, चौघांना अटक

Nagpur Murder Case | दक्षिण एक्सप्रेसमध्ये घटना

पुढारी वृत्तसेवा

नागपूर, पुढारी वृत्तसेवा : हैदराबादवरून हजरत निजामुद्दीन अर्थात दिल्लीच्या दिशेने निघालेल्या दक्षिण एक्सप्रेसमध्ये आज (दि. २) सकाळी नऊच्या सुमारास हाणामारीत एका तरुणाचा मृत्यू झाला. धावत्या ट्रेनमध्ये ही घटना घडल्याने रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. (Nagpur Murder Case)

नागपूर मध्यवर्ती रेल्वे स्थानकावर या युवकाला खाली उतरवण्यात आल्यानंतर तपासणी केली असता तो मृत झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. या संदर्भात चार युवकांना लोहमार्ग पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ही घटना व्यक्तिगत वादातून की लूटमारीतून घडली याविषयीचा संशय कायम आहे. हा तरुण दिल्लीच्या दिशेने दक्षिण एक्सप्रेसच्या जनरल बोगीत प्रवास करीत होता. सरासरी 30 वर्षीय या मृत तरुणाचे नाव अद्याप कळू शकलेले नाही.

दरम्यान, रेल्वे, लोहमार्ग पोलिसांनी पोलिसांनी या घटनेत चार युवकांना ताब्यात घेतले असून चौकशीत नेमके काय कारण झाले हे कळणार आहे. वर्धा जिल्ह्यातील सेवाग्राम रेल्वे स्थानकाजवळ या युवकांमध्ये हाणामारी झाल्याची माहिती आहे. मात्र, ही गाडी सेवाग्राम रेल्वे स्थानकावर थांबत नसल्याने नागपूर मध्यवर्ती रेल्वे स्थानक येईपर्यंत या युवकाचा मारहाणीत गंभीर जखमी झाल्याने मृत्यू झाला. दक्षिण एक्सप्रेस रेल्वे स्थानकावर पोहोचताच पोलीस व वैद्यकीय पथकाने त्या तरुणाला खाली उतरवून तातडीने रुग्णालयात रवाना केले. मात्र, डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT