Fake NIA Officer Arrested
नागपूर : देशातील सुरक्षेच्या दृष्टीने महत्वपूर्ण केंद्रीय तपास यंत्रणा अर्थात एनआयएचा अधिकारी असल्याची बतावणी करीत अनेकाना गंडा घालणाऱ्या एका युवकास गुन्हे शाखेने अटक केली आहे.
प्रल्हाद दिलीपकुमार सिन्हा (वय 25) असे या महाठग आरोपीचे नाव आहे. तो एसीआयओ अधिकारी असल्याचे सांगत होता. त्याच्याकडे एएनआयचे बनावट ओळखपत्र यासोबतच बोगस आधार, अनेक आक्षेपार्ह कागदपत्रे, मोबाईल, सिमकार्ड जप्त करण्यात आली आहेत. यासंदर्भात यशोधरा पोलिस ठाण्यात फसवणुकीची तक्रार आणि गुन्हा दाखल करण्यात आला होता.