नागपूर

नागपूर : शाळा महाविद्यालयांच्या सुट्टीचा ‘फेक मेसेज’ व्हायरल : जिल्हाधिकारी इटनकर

backup backup

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : नागपूर महानगरातील शाळा, महाविद्यालय व शैक्षणिक संस्था उद्या आणि परवा बंद राहतील असा चुकीचा संदेश समाज माध्यमांवर फिरत आहे. मात्र हे चुकीचे असून शाळा महाविद्यालय नियमित प्रमाणे सुरू असतील. या चुकीच्या मेसेज कडे दुर्लक्ष करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.

भारतीय हवामान खात्याचा दुजोरा देत कुणीतरी खोडसाळपणे उद्या व परवा मुसळधार पावसाचा इशारा देऊन शाळा कॉलेजेस बंद राहतील असा चुकीचा संदेश समाज माध्यमांवर पसरवला आहे. याकडे दुर्लक्ष करण्यात यावे. हा फेक मेसेज कोणी पसरवला याबाबतची चौकशी करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.

SCROLL FOR NEXT