जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर 
नागपूर

Nagpur Election News | जिल्ह्यात 15 नगर परिषद, 12 नगर पंचायतींसाठी निवडणूक

जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. विपिन इटनकर यांची माहिती

पुढारी वृत्तसेवा

नागपूर - राज्य निवडणूक आयोगाने नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणूकीसाठी कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार जिल्ह्यातील १५ नगर परिषद आणि १२ नगर पंचायतीसाठी निवडणूक होणार आहे. निवडणूक आयोगाच्या निर्देशांनुसार निवडणुका मुख्य, निर्भय व निष्पक्ष, पारदर्शक वातावरणात पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. विपिन इटनकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. प्रशासनामार्फत करण्यात आलेल्या निवडणूक सज्जतेची त्यांनी यावेळी माहिती दिली.

असा असेल कार्यकम

निवडणुकांसाठी नामनिर्देशनपत्र दाखल करण्यास 10 नोव्हेंबर 2025 पासून सुरुवात होईल. नामनिर्देशपत्र दाखल करण्याची अंतिम तारीख 17 नोव्हेंबर असेल. नामनिर्देशनपत्रांची छाननी 18 नोव्हेंबर रोजी होईल. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या निर्णयाविरुद्ध अपील नसलेल्या ठिकाणी 21 नोव्हेंबरपर्यंत तर अपील असलेल्या ठिकाणी 25 नोव्हेंबरपर्यंत नामनिर्देशनपत्रे मागे घेता येतील. 2 डिसेंबर रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 पर्यंत मतदानाची वेळ असेल. मतमोजणी सर्व संबंधित ठिकाणी 3 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजल्यापासून सुरु होईल. निकाल जाहीर झाल्यानंतर नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या क्षेत्रापुरती आचारसंहिता संपुष्टात येईल. यावेळी जिल्हा पोलिस अधीक्षक ग्रामीण हर्ष पोद्दार, मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी, निवासी उपजिल्हाधिकारी अनुप खांडे, जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, नगर परिषद व नगर पंचायत मुख्याधिकारी उपस्थित होते.

साडे चार हजार अधिकारी कर्मचारी कार्यरत असणार

नगरपरिषद व नगरपंचायतच्या माध्यमातून 546 सदस्य निवडले जाणार आहेत. एकूण 374 प्रभाग असणार आहेत. प्रारूप मतदार यादीनुसार मतदारांची संख्या सुमारे सात लाख बत्तीस हजारच्या वर असणार आहे. 27 निवडणूक निर्णय अधिकारी तर 27 सहायक निवडणूक अधिकारी कार्यरत असणार आहेत. सुमारे 4 हजार 455 अधिकारी व कर्मचारी या निवडणूक प्रक्रियेत सहभागी होणार आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT