paper leak case File Photo
नागपूर

Nagpur paper leak case: शिक्षण मंडळामार्फतही चौकशी सुरू, पेपरफुटीचा इन्कार

पेपर फूट प्रकरणांत दोन विद्यार्थ्यांचे मोबाईल पोलिसांनी ताब्यात घेतले असून पोलिसांचा तपास सुरू आहे

पुढारी वृत्तसेवा

नागपूर : पेपर फूट प्रकरणांत दोन विद्यार्थ्यांचे मोबाईल पोलिसांनी ताब्यात घेतले असून पोलिसांचा तपास सुरू आहे. यासोबतच शिक्षण मंडळाकडूनही स्वतंत्र चौकशी सुरू असून दोषींवर कारवाई केली जाणार असल्याची माहिती नागपूर विभागीय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष डॉ. शिवलिंग पटले यांनी दिली. गैरप्रकार आम्ही वेळीच रोखला. पेपर फुटल्याचा त्यांनी इंकार केला.

नागपूर विभागीय शिक्षण मंडळांतर्गत गणिताचा पेपर एका विद्यार्थिनीच्या मोबाईलमध्ये आढळून आला याप्रकरणी पोलिस शोध घेत आहेत. आम्ही पण बोर्डाच्या नियमानुसार चौकशी करीत आहोत. पोलिसांचा तपास सुरू असून काही जणांना यामध्ये अटक झाली, तपासाअंती दोषींवर कारवाई नक्की केली जाणार आहे.

दरम्यान, प्रश्नपत्रिका 25 ऐवजी 24 मिळाल्या याबाबतीत तक्रारीनुसार चौकशी सुरू आहे. मात्र प्रेसमधून आलेले पेपर पॅकिंग विद्यार्थ्यांसमोर त्यांच्या स्वाक्षरिनिशीशी फोडले जातात जर कमी प्रश्नपत्रिका आल्या तर लगेच पंचनामा केला जातो. सेंटरवर 11 वाजण्याआधी प्रश्नपत्रिका कोणालाही पहायला मिळत नसते.

त्यामुळे यामध्ये कोणताही पेपर फुटीचा प्रकार झालेला नाही. उलट संबंधित विद्यार्थिनीचा मोबाईलवर पेपरशी संबंधित उत्तरे शोधण्याचा प्रयत्न केंद्रावरील पर्यवेक्षकानी हाणून पाडला असा दावा शिक्षण मंडळाचे अध्यक्ष डॉ पटले यांनी आज माध्यमांशी बोलताना केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT